

Hatkanangale Nagav 18 year old Youth Death
शिरोली एमआयडीसी: पोटदुखीचे निमित्त होऊन एका मुलाचा मृत्यू झाला. प्रवीण शिवाजी गोंधळी (वय १८, रा. संभाजी नगर, आबा माळी मळा, नागाव, ता. हातकणंगले ) असे त्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रवीण हा रजपूतवाडी (ता. करवीर) येथील निवासी शाळेत बारावीच्या वर्गात शिकत होता . गणेश उत्सवाच्या सुट्टीनिमित्त तो आपल्या घरी येऊन सार्वजनिक गणेश उत्सवातही सहभागी झाला होता. रविवारी सुट्टी संपल्याने सोमवारी तो शाळेत परत जाणार होता. पण पहाटे त्याच्या पोटात अचानक दुखू लागले. त्यामुळे प्राथमिक उपचारासाठी त्याला नागाव येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापुरातील सरकारी रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना रात्री त्याचा मृत्यू झाला.
आठ दिवसांपासून त्याच्या पोटात दुखत होते. पण त्याने घरी सांगितले नसावे. वेदना असह्य झाल्याने तो सोमवारी आपल्या आई व बहिणी सोबत दवाखान्यात गेला. मात्र, त्याच्या पोटाची गंभीर स्थिती पाहूनच डॉक्टरांनी उपचारासाठी कोल्हापुरात नेण्याचा सल्ला दिला. त्याच्या स्वादुपिंडाला सूज होती. आणि पोटात पाणीही झाले होते. पण याबाबत तो घरी काहीच बोलला नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.