Shirol News | शिरढोण ग्रामपंचायतची चौकशी रखडल्याने ग्रामस्थांत उलटसुलट चर्चा; गैरव्यवहार प्रकरणावर संशयाची छाया

१५ वा वित्त आयोग निधी तसेच घरफाळा व पाणीपट्टी वसुली खर्चात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप
Shirdhon Gram Panchayat
Shirdhon Gram PanchayatPudhari
Published on
Updated on

Shirdhon Gram Panchayat corruption inquiry delay

शिरढोण : शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीमध्ये २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीत १५ वा वित्त आयोग निधी तसेच घरफाळा व पाणीपट्टी वसुली खर्चात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी यासाठी १५ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तीन महिन्यांनंतरही चौकशीचा ठोस निष्कर्ष समोर न आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Shirdhon Gram Panchayat
Kolhapur Accident | सलगर–सदलगा महामार्गावर भीषण अपघात: निवृत्त शिक्षक ठार, एक गंभीर जखमी

ग्रामस्थांच्या मते, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट तसेच चौकशी समितीकडून या प्रकरणात जाणूनबुजून टाळाटाळ केली जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा गावात सुरू झाली आहे.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडून “अहवाल वर पाठवला आहे” एवढेच सांगून वेळकाढूपणा केला जात असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तक्रारदारांकडूनही याबाबत मौन बाळगले जात असल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. चौकशीच्या मागणीचा केवळ फार्स होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये वाढत असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Shirdhon Gram Panchayat
Kolhapur News : सर्व शिक्षा अभियान बंद; कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

याप्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशीची आणि करवाईची मागणी करू.तसेच कारवाई बाबत जाणीवपूर्वक दिशाभूल करून टाळाटाळ केल्यास जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.

- पोपटराव पुजारी, भाजपा नेते शिरढोण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news