Kolhapur News | आरोग्य केंद्र की विश्रांतीगृह? अचानक पाहणीत डॉक्टर झोपेत; रुग्ण सुविधांचा बोजवारा

शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार
Shirol Kavathe Guland Primary Health Centre
Shirol Kavathe Guland Primary Health CentrePudhari
Published on
Updated on

Shirol Kavathe Guland Primary Health Centre

कवठेगुलंद : शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापूरे यांनी गुरुवारी अचानक भेट देत आरोग्य सेवेतील गंभीर त्रुटी उघड केल्या.

पाहणीदरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. झेब्राराम आणि डॉ. जयपालसिंग हे दुपारच्या वेळी कक्षात झोपलेल्या अवस्थेत आढळल्याचा दावा शहापूरे यांनी केला. तसेच उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांकडून रुग्ण तपासणी करून घेतली जात असल्याचेही निदर्शनास आले.

आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याचे उघड झाले. औषधे दिल्यानंतर “पाणी घरी जाऊन प्या” असे सांगितले जात असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. केंद्रात डॉक्टर, उपचार सुविधा व आपत्कालीन सेवांची माहिती दर्शविणारा फलक नसल्याचेही आढळले. नोंदवही व अभिलेख अद्ययावत नसल्याबाबतही तक्रारी समोर आल्या.

Shirol Kavathe Guland Primary Health Centre
kolhapur | गव्याचा दाम्पत्यावर हल्ला; महिला गंभीर जखमी

बाहेरील राज्यातील डॉक्टरांना मराठी भाषा अवगत नसल्याने ग्रामीण रुग्णांना संवाद साधताना अडचणी येत असल्याचे शहापूरे यांनी सांगितले. गंभीर रुग्णांना रुग्णवाहिका नाकारली जात असल्याचाही आरोप करण्यात आला. औषध विभागाच्या किल्लीसंदर्भातही निष्काळजीपणा समोर आल्याने औषध वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यावेळी प्रशांत शहापूरे यांनी सहकारी प्रमोद भेंडवडे, राहुल नरके व सागर बंडगर यांच्यासह केंद्राची पाहणी केली. घटनेची गंभीर दखल घेत तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर व पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे यांना तातडीने बोलावण्यात आले. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

Shirol Kavathe Guland Primary Health Centre
kolhapur | रंकाळ्यात संगीत कारंजाचे काम सुरू

कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील हलगर्जीपणा गंभीर आहे. रुग्णांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करणार आहे

- प्रशांत शहापूरे, आलास, जिल्हा परिषद सदस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news