Wild Animal Attack Kolhapur | वन्यजीवांच्या हल्ल्यांनी शाहूवाडी तालुक्यात दहशतीचे सावट; शेंबवणे येथे हल्ल्यात एकाचा मृत्यू

वनविभागाच्या कारभाराविरोधात नागरिक, शेतकऱ्यांमध्ये संताप
Wild Animal Attack
Wild Animal AttackAi Photo
Published on
Updated on

Shahuwadi Shembavane Death Attack

बांबवडे : गेल्या दोन वर्षांपासून शाहूवाडी तालुक्यात वन्यजीवांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीवर वनविभागाकडून अपेक्षित गांभीर्याने उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे मानवांसह पाळीव जनावरे आणि शेतीचेही नुकसान होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

तालुक्यातील विविध भागांत वन्यजीवांकडून मानव तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनांमध्ये काही जणांना जीव गमवावा लागला असून, मोठ्या संख्येने पाळीव जनावरे आणि कुत्र्यांचा बळी गेल्याचा दावा करण्यात येत आहे. वन्यजीवांच्या वावरामुळे शेतीचेही नुकसान होत असल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी, अनेक जण सुरक्षेच्या कारणास्तव शेतात जाणे टाळत असल्याचे चित्र आहे.

Wild Animal Attack
Kolhapur| त्या' चौदाशे दूध संस्था प्रतिनिधींचा सत्यविजय कृतज्ञता मेळावा!

या परिस्थितीचा परिणाम विद्यार्थ्यांवरही होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वन्यजीवांच्या हल्ल्याची भीती असल्याने काही पालक मुलांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शेंबवणे येथे काल वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर वनविभागाकडून ठोस उपाययोजना आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत स्पष्ट आश्वासन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षित कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढला आहे.

Wild Animal Attack
kolhapur | अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतेय विद्यार्थ्यांची ‘डीअर जिंदगी’

कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

मानवी जीवितासोबतच शेती आणि पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, वनविभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वन्यजीवांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, बाधित कुटुंबांना नियमानुसार मदत द्यावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शाहूवाडी तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news