Shahuwadi Gas Shortage | शाहुवाडीत गॅस टंचाईचं सावट अन् भीतीचं काहूर

जागतिक युद्धाची धग शाहुवाडीच्या स्वयंपाकघरात; गॅस टंचाईच्या अफवेने रांगाच रांगा
Kolhapur LPG Supply Crisis
गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेतPudhari
Published on
Updated on

Kolhapur LPG Supply Crisis

सुभाष पाटील

​ विशाळगड : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील धगधगत्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता थेट शाहुवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील चुलींपर्यंत पोहोचले आहेत. "युद्ध सुरू झाले तर गॅस मिळणार नाही," या भीतीने आणि सोशल मीडियावरील अफवांमुळे तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

रणरणत्या उन्हात सिलिंडरसाठी 'वनवा'

​गेल्या पाच दिवसांपासून गॅस पुरवठ्याबाबत अनिश्चितता पसरल्याने शुक्रवारी पेरिड मार्गावरील महेश इंडेन गॅस एजन्सीबाहेर अभूतपूर्व गर्दी झाली होती. सकाळी ७ वाजल्यापासूनच नागरिकांनी रिकाम्या टाक्यांसह रांगा लावल्या होत्या. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता, "दोन तास थांबू, पण टाकी घेऊनच जाऊ" अशा जिद्दीने नागरिक ताटकळत उभे होते. ज्यांच्याकडे अतिरिक्त सिलिंडरची सोय आहे, असे ग्राहकही भविष्यातील 'उपासमारी'च्या भीतीने साठेबाजी करताना दिसत आहेत.

Kolhapur LPG Supply Crisis
Kolhapur gas cylinder distribution | कोल्हापुरात पोलिस बंदोबस्तात ग्राहकांना गॅस सिलिंडरचे वितरण

तांत्रिक अडचण अन् अफवांचा बाजार

​गॅस बुकिंगच्या नियमावलीत झालेले बदल आणि ओटीपी जनरेट होण्यातील तांत्रिक बिघाडामुळे वितरण प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. नेमकी हीच संधी साधून 'गॅस पुरवठा कायमचा खंडित होणार' अशा अफवांनी जोर धरला. यामुळे मागणीत अचानक मोठी वाढ झाली असून प्रशासकीय यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे.

​सध्या एजन्सी प्रशासनाकडून पुरवठा सुरळीत असल्याचे सांगण्यात येत असले तरी, जागतिक अस्थिरतेच्या सावटाखाली शाहुवाडीकर सध्या हुरहुरलेल्या अवस्थेत आहेत.

गॅसचा कोणताही अधिकृत तुटवडा निर्माण झालेला नाही. पुरवठा बंद होईल, या अफवेपोटी ग्राहकांनी एकाच वेळी गर्दी केली आहे. ओटीपी जनरेट होण्यात काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे वितरण संथ झाले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, सर्वांना वेळेत सिलिंडर उपलब्ध करून दिले जाईल.

- प्रसाद नाबगे (संचालक, महेश इंडेन गॅस एजन्सी, येळाणे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news