Kolhapur Theft | बांबवडे आठवडे बाजारात चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवशी ७ मोबाईल चोरीला

अनेक चोऱ्यांचा तपास रखडल्याचा आरोप; गुन्हे दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याने नागरिकांत संताप
Bambavade Weekly Market Mobile Theft
Bambavade Weekly Market Mobile Theft Pudhari
Published on: 
Updated on: 

Bambavade Weekly Market Mobile Theft

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या बांबवडे येथील बाजारपेठेत भुरट्या चोऱ्या आणि पाकीटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून, गुरुवारी एकाच दिवशी सात नागरिकांचे मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे व्यापारी, शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच चोरीच्या तक्रारींवरून गुन्हे दाखल करून घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बांबवडे बाजारपेठ, मुख्य रस्ता आणि गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आठवडे बाजारात खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याचा फायदा चोरटे घेत आहेत. भाजीपाला, किराणा आणि इतर वस्तूंची खरेदी करताना होणाऱ्या गर्दीत नागरिकांच्या खिशातील मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंवर चोरटे हात साफ करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

Bambavade Weekly Market Mobile Theft
Kolhapur Pulachi Shiroli garbage depot issue|पुलाची शिरोलीच्या कचरा डेपोमुळे प्रचंड दुर्गंधी; स्मँक भवन परिसरात कुत्र्यांची दहशत

गर्दीचा फायदा घेत सात मोबाईल लांबवले

गुरुवारी भरलेल्या आठवडे बाजारात शेतकरी, महिला आणि ग्रामस्थ खरेदीत व्यस्त असताना चोरट्यांनी सात जणांचे मोबाईल लंपास केले. मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच संबंधित नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या तक्रारींच्या आधारे गुन्हा नोंदवून घेण्याऐवजी केवळ अर्ज लिहून घेतला जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

जुन्या चोऱ्यांचा तपासही रखडल्याची चर्चा

बांबवडे परिसरात यापूर्वी घडलेल्या अनेक चोरीच्या घटनांचा तपास अद्याप पूर्णत्वास गेलेला नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना होत नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर तांत्रिक यंत्रणांचा वापर करूनही चोरीच्या घटनांचा छडा का लागत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

चोरीच्या तक्रारींवरून गुन्हे नोंदवण्यास टाळाटाळ होत असल्याच्या आरोपांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Bambavade Weekly Market Mobile Theft
Kolhapur Accident | तेरवाड येथे भरधाव डंपरची तीन दुचाकींना धडक; तिघांचा मृत्यू , चौघे गंभीर

गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

बांबवडे बाजारपेठेतील वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशी पोलिसांनी विशेष गस्त घालावी, गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवावा आणि चोरीला गेलेल्या मोबाईलचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून होत आहे. तसेच चोरीच्या तक्रारींची नियमानुसार नोंद घेऊन प्रलंबित प्रकरणांचा तपास वेगाने पूर्ण करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news