Kolhapur Accident | तेरवाड येथे भरधाव डंपरची तीन दुचाकींना धडक; तिघांचा मृत्यू , चौघे गंभीर

हेरवाडहून कुरुंदवाडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला उडवले
 Herwad  Terwad  Dumper Crash
Herwad Terwad Dumper CrashPudhari
Published on: 
Updated on: 

Herwad Terwad Dumper Crash

शिरढोण : हेरवाडहून कुरुंदवाडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने तेरवाड (ता. शिरोळ) येथील एका रसवंती गृहाजवळ पुढे जाणाऱ्या तीन दुचाकींना मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेसह दोन पुरुषांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अब्दुललाट येथील एका महिला व पुरुषाचा, तसेच अर्जुनवाड येथील एका तरुणाचा समावेश आहे. या दुर्घटनेत चौघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डंपर हेरवाडहून कुरुंदवाडच्या दिशेने जात असताना तेरवाडजवळ त्याने पुढे जाणाऱ्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकींवरील काही जण रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात तिघांचा जागीच किंवा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले.

 Herwad  Terwad  Dumper Crash
Kolhapur News| दुष्काळग्रस्त १६ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी

धडकेनंतर डंपर रस्त्यालगतच्या बॅरिकेडला धडकून शेतात जाऊन थांबला. दरम्यान, डंपर चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नागरिकांनी मदत केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा सुरू केला. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पसार झालेल्या डंपर चालकाचा शोधही सुरू आहे.

या भीषण अपघातामुळे तेरवाड परिसरात हळहळ व्यक्त होत असून, काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

 Herwad  Terwad  Dumper Crash
kolhapur News| साखर कारखाने १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू करू देणार नाही

डंपर शेतात; चालक पसार

तेरवाड येथे तीन दुचाकींना धडक दिल्यानंतर डंपर बॅरिकेडला धडकून रस्त्यालगतच्या शेतात जाऊन थांबला. अपघातानंतर चालक वाहन सोडून पसार झाला. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी पंचनामा करून चालकाचा शोध सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news