Kolhapur accident | सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात ! रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी

सुमारे चार तास वाहनधारकांना या कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला
Kolhapur accident | सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात ! रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी
Published on
Updated on

नागाव : महामार्गावरील पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे उड्डाणपुलावर बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. अपघातात एका अज्ञात वाहनाने मालवाहतूक रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास विस्कळीत झाली होती.

Kolhapur accident | सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात ! रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी
Palghar Accident | मुंबई- अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; कार चालकाचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीतून कास्टिंग घेऊन शिरोलीकडे येत होता. दरम्यान सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पुलाची शिरोली सांगली फाटा उड्डाणपुलावर एका अज्ञात वाहनाने रिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत रिक्षा महामार्गावरच पलटी झाली.

Kolhapur accident | सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात ! रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी
Ratnagiri Accident : मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बस-रिक्षाचा भीषण अपघात

अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून अपघातग्रस्त रिक्षा बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या महामार्गाचे काम सुरू असल्याने आणि अपघातामुळे लागलेल्या रांगांमुळे रात्री आठवाजेपर्यंत या महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सुमारे चार तास वाहनधारकांना या कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news