Samarjitsinh Ghatge BJP| कोल्हापुरात शरद पवारांच्‍या राष्ट्रवादीला धक्का; समरजितसिंह घाटगेंचा भाजपमध्ये प्रवेश

Samarjitsinh Ghatge rejoins BJP|मुंबईतील पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थिती
Samarjitsinh Ghatge BJP
समरजितसिंह घाटगे यांचे पक्षात स्‍वागत करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. सोबत मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे, नवनाथ बन्‍ने आदी. Pudhari Photo.
Published on
Updated on

Samarjitsinh Ghatge rejoins BJP

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले कागलमधील शाहू उद्योग समूहाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी आज (दि. ८) पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला. येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीची उमेदवारी हसन मुश्रीफ यांना मिळाली होती. यानंतर समरजीतसिंह घाटगे यांनी भाजपची साथ सोडून शरद पवारांच्‍या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मुश्रीफांविरोधात निवडणूकही लढवली होती. मात्र नुकत्याच झालेल्या कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने त्यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर 'राजकीय' मैत्री केली होती. तेव्हापासून समरजितसिंह घाटगे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. आज अखेर त्यावर अधिकृत पक्ष प्रवेशाची मोहोर उमटली. पक्ष प्रवेशावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे, नवनाथ बन्‍ने यांची प्रमुख उपस्‍थिती होती.

Samarjitsinh Ghatge BJP
Vinod Tawde comeback : विनोद तावडे पुन्हा संसदीय राजकारणात, ‘श्रद्धा आणि सबुरी’ला मिळाले फळ!

दोन विधानसभा निवडणुकीत दिली होती प्रभावी लढत

सीए सारखे उच्चशिक्षित समरजितसिंह घाटगे हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज आहेत. विक्रमसिंहराजे घाटगे संस्थापक असलेल्या देशाच्या सहकारी साखर कारखानदारीत अग्रेसर शाहू साखर कारखाना, राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँक, शाहू दूध संघ, शाहू कृषी संघ आणि शिक्षण संकुल अशा विविध संस्थांचे ते नेतृत्व करत आहेत. यापूर्वी त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आपली छाप पाडली होती. मागील दोन विधानसभा निवडणुकीतही त्यांनी प्रभावी लढत देत राजकीय अस्तित्व ठळकपणे दाखवून दिले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील पक्ष अधिक भक्कम होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Samarjitsinh Ghatge BJP
Kagal victory: कागलमधील विजयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांची मंत्री मुश्रीफ व समरजित घाटगे यांनी घेतली भेट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news