

कागल : कागल तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेास व भारतीय जनता पक्षाच्या युतीने सहा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समिती मतदारसंघांमध्ये घवघवीत विजय मिळवले. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत आभार मानले.
फडणवीस यांच्या पुढाकारातून मंत्री हसन मुश्रीफ, शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे व माजी आमदार संजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या युतीने कागल विधानसभा मतदारसंघात विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. संघर्षाऐवजी समन्वय व समझोत्यातून जनतेच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कागल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप-राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासह विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली.