Kolhapur Climate Change
Kolhapur Low Temperature (File Photo)

Kolhapur Weather News | कोल्हापुरात मे महिन्यात 56 वर्षांतील नीचांकी कमाल तापमान

Kolhapur Climate Change | पहिल्यांदाच उन्हाळ्यात 24.8 कमाल तापमान झाले रेकॉर्ड
Published on
आशिष शिंदे
Summary

उन्हाळ्यातील पावसामुळे वातावरणात होतोय बदल

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात घसरण

Kolhapur Climate Change

कोल्हापूर : ऐन उन्हाळ्यातील पावसामुळे कोल्हापुरातील तापमानात कमालीचे बदल पाहायला मिळत आहेत. यामुळे ऐरवी उन्हाचे चटके बसणार्‍या मे महिन्यात तापमानाचा पारा कमालीचा घसरला. यंदाच्या एप्रिलमध्ये 40 पार तापमान असलेल्या कोल्हापुरात मे महिन्यात मात्र घट झाली आहे. कोल्हापुरातील गेल्या 56 वर्षांतील नीचांकी कमाल तापमानाची नोंद शनिवारी झाली. 1969 नंतर पहिल्यांदाच उन्हाळ्यात इतक्या कमी तापमान नोंदले गेले. दैनंदिन सरासरी कमाल तापमानात तब्बल 10 अंशांची घसरले आणि पारा 24.8 अंशांवर स्थिरावला.

मे म्हणजे रखरखत्या उन्हाचा महिना. यंदा तर एप्रिलमध्येच कमाल तापमानाने उच्चांक गाठल्याने मे महिन्यात उन्हाचा कहर पाहायला मिळेल, असे अंदाज बांधले जात होते. मात्र, हवामानाचे चक्र फिरले आणि उन्हाळ्याचा पावसाळा झाला. मे महिन्यात कोसळलेल्या वळवाने वातावरण पूर्णपणे पावसाळी झाले आहे. यामुळे कोल्हापुरातील कमाल तापमानात रेकॉर्डब—ेक घसरण झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार कोल्हापुरात 1970 पासून आजपर्यंत कमाल तापमान 24 अंशांपर्यंत घसरले नाही. यापूर्वी नीचांकी कमाल तापमानाची नोंद कोल्हापुरात 20 मे 2000 साली झाली होती.

Kolhapur Climate Change
kolhapur : वळवाचा दणका, खरीप उत्पादनाला बसणार फटका

यंदा मे महिन्यात दोनवेळा नीचांकी कमाल तापमानाची नोंद झाली. 22 मे 2025 साली कोल्हापुरात 25.2 अंश सेल्सिअस तापमान होते. यानंतर दोनच दिवसांत तापमानात पुन्हा घसरण झाली व पारा 24.8 अंशांपर्यंत खाली आला.

Kolhapur Climate Change
Kolhapur Weather | कोल्हापूरला रविवारी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’

56 वर्षांत यावेळी झाली नीचांकी तापमानाची नोंद

दिनांक तापमान

23 मे 2025 24.8

20 मे 2000 25.0

22 मे 2025 25.2

19 मे 2000 25.4

25 मे 1999 26.0

09 मे 1999 26.7

31 मे 2006 27.4

04 मे 2004 27.5

31 मे 1990 27.7

26 मे 1970 27.9

राज्याच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात ‘कमी दाबाचे क्षेत्र’ निर्माण झाले होते, ते अधिक तीव्र होऊन त्याचे ‘डीप डिप्रेशन’मध्ये रूपांतर झाले आहे. सोप्या भाषेत सांगायचे, तर हे कमी दाबाचे क्षेत्र खूप शक्तिशाली झाले. सामान्यतः, समुद्रात जेव्हा असे कमी दाबाचे क्षेत्र तयार होते, तेव्हा ते आसपासच्या वातावरणातील उष्णता आणि आर्द्रता स्वतःकडे खेचून घेते. यामुळे कमाल तापमानात घसरण पाहायला मिळते.

अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक, मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news