

कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा जबर तडाखा जाणवत आहे. गुरुवारी कमाल तापमानात दोन अंशांची घट झाली. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाने कोल्हापूरला रविवारी (दि. 20) उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. यामुळे कमाल तापमान पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे. यामुळे कोल्हापूरकरांनो उन्हात फिरताना आता काळजी घेण्याची गरज आहे.
तीन दिवसांपासून कोल्हापूरचे तापमान 39 अंशांच्या पुढे होते. यामुळे रखरखत्या उन्हाचा तीव— तडाखा जाणवत होता. गुरुवारी कमाल तापमानात घट होऊन पारा 37.1 अंशांवर, तर किमान तापमान 23.1 अंशांवर स्थिरावले आहे. तापमानात घट झाली असली, तरी आर्द्रता आणि ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. दुपारी उन्हाची तीव—ता वाढलेली असते. अशात हवामान विभागाने तापमान वाढण्याचा अंदाज दिल्याने उष्मा वाढणार आहे. यामुळे आता काळजी घेण्याची गरज आहे.
हवामान विभागाच्या दैनंदिन अहवालानुसार राज्यात रविवारी (दि. 20) कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, धाराशीव, आहिल्यानगर, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.