स्वच्छ हवा सर्वेक्षणात कोल्हापूर देशात २३ वे

स्वच्छ हवा सर्वेक्षणात कोल्हापूर देशात २३ वे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वाढत्या हवा प्रदूषणामुळे शहराचा सर्वाधिक प्रदूषित शहराच्या यादीत समावेश झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत कोल्हापूरसह देशातील 131 प्रदूषित शहरातील प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याअंतर्गत स्वच्छ वायू सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या सर्वेक्षणामध्ये कोल्हापूर शहर देशात 23 व्या क्रमांकावर आले आहे.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमामध्ये कोल्हापूरसह देशातील 131 शहरांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 19 शहरे आहेत. लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार स्वच्छ वायू सर्वेक्षण करण्यात आले आहे. याअंतर्गत 10 लाख लोकसंख्येची शहरे, तीन ते 10 लाख व तीन लाख लोकसंख्येच्या शहरांची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार शहराचे गुण व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे गुण देण्यात आले आहेत. स्वच्छ वायू सर्वेक्षणात तीन ते 10 लाख लोकसंख्या असणार्‍या शहरांच्या यादीत कोल्हापूर 23 व्या क्रमांकावर आहे. या शहरांच्या यादीत नवी मुंबई आठव्या स्थानी, लातूर 17 व्या स्थानी, चंद्रपूर 15, लातूर 17, सोलापूर 19, उल्हासनगर 31, अकोला 32, जळगाव 33, सांगली 35 व्या स्थानी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news