Kolhapur Rain : पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ३६ फुटांवर

राजाराम बंधारा पाणी पातळी
राजाराम बंधारा पाणी पातळी

कोल्‍हापूर : पुढारी वृत्‍तसेवा कोल्‍हापूर शहर आणि परिसरात काल (शुक्रवार) रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर सोसाट्‍याचा वारा आणि जोरदार पाउस सुरू आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ होत आहे. दरम्‍यान राजाराम बंधारा येथे पहाटे दोन वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ३५ फूट ८ इंच अशी होती. सकाळी दहा वाजेपर्यंत यामध्ये तीन इंचांनी वाढ होऊन पाणी पातळी ३५ फूट ११ इंच अशी झाली. यानंतर सकाळी ११ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ३६ फूट इतकी झाली आहे.

जसजसा पावसाचा जोर वाढेल तसे धरणातील पाणी साठ्यातही वाढ होत राहणार आहे. दरम्‍यान पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. त्‍या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनही सतर्क झाले असून, पुरस्‍थिती उद्‍भवल्‍यास त्‍या परिस्‍थितीशी तोंड देण्यासाठी जिल्‍हा प्रशासनाकडून सुरक्षा बोटी तसेच बचाव पथके सुसज्‍ज ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news