Kolhapur rain update : जुलैमध्ये जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी!

16 पाटबंधारे प्रकल्पांपैकी सहा प्रकल्प 100 टक्के भरले! जिल्ह्यात एकूण 98 टीएमसी पाणीसाठा
Rain Update
Rain UpdatePudhari
Published on
Updated on

आशिष ल.पाटील

गुडाळ : जिल्ह्यात जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात दमदार हजेरी लावल्याने 31 जुलै अखेर जिल्ह्यातील 16 पाटबंधारे प्रकल्पापैकी सहा प्रकल्प 100 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील सर्व 56 लघु पाटबंधारे तलाव ही पूर्णपणे भरले आहेत. 31 जुलै अखेर या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून 98 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

Rain Update
Kolhapur rain : गडहिंग्लज-कागल रस्त्यावर पाणी; मुरगूडचा सरपिराजीराव तलाव ओसंडून वाहू लागला

कोल्हापूर जिल्ह्यात दूधगंगा,राधानगरी, तुळशी आणि वारणा हे चार मोठे पाटबंधारे प्रकल्प आहेत. तर कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ, सर्फनाला आणि धामणी हे मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत. याशिवाय जिल्ह्यात जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत एकूण 56 लघु पाटबंधारे तलाव आहेत.

एक जूनपासून 31 जुलै पर्यंत 16 पाटबंधारे प्रकल्पापैकी आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्प क्षेत्रात सर्वाधिक 3072 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. आजऱ्यातीलच आंबेओहोळ प्रकल्प क्षेत्रात सर्वात कमी म्हणजे 1142 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. 31 जुलै 2026 अखेर 16 पाटबंधारे प्रकल्पात मिळून 90.765 टीएमसी तर 56 लघु पाटबंधारे तलावात मिळून 7.250 टीएमसी असा जिल्ह्यात एकूण 98.015 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

Rain Update
Kolhapur rain update : कृष्णा आणि पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ; औरवाड-नरसोबाची वाडी जुना पूल पाण्याखाली

1 जून पासून 31 जुलै अखेर जिल्ह्यात पाटबंधारे प्रकल्प क्षेत्रात झालेला एकूण पाऊस आणि धरण भरलेची टक्केवारी पुढीलप्रमाणे,

कंसात प्रथम पाऊस नंतर धरण टक्केवारी

राधानगरी: 2851 मी.मी 100%

तुळशी: 2163 मी.मी 84:23%

वारणा: 1551 मी.मी.85:71%

दूधगंगा: 2073 मी.मी65:14%

कासारी: 2299 मी.मी.83:97%

कडवी: 1890 मी.मी.99:5%

कुंभी: 3064 मी.मी.79:67%

पाटगाव: 3067 मी.मी.70:18%

चिकोत्रा: 1627 मी.मी.56:1%

चित्री: 2001मी.मी.100%

जंगमहट्टी: 1511 मि.मी.100%

घटप्रभा: 2418 मी.मी.100%

जांबरे: 2464मी.मी.100%

आंबेओहोळ: 1142 मी.मी.92:77%

सर्फनाला: 3072मी.मी.100%

धामणी:1709मी.मी. 33:57%

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news