Kolhapur Rain Update: गडहिंग्लजमध्ये जोरदार पाऊस; भडगाव येथील पर्यायी पुल पूर्णपणे गेला वाहून

Kolhapur Rain Update
Kolhapur Rain Updateजह्पोीग
Published on
Updated on

Kolhapur Rain Update: कोल्हापुरात गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. धरणक्षेत्रातीही पावसाने जोर धरला असून नद्यांच्या पातळ्या देखील झपाट्याने वाढत आहेत. गडहिंग्लज तालुक्यातही पावसाचा जोर कायम असल्यानं हिरण्यकेशी नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. या वाढलेल्या प्रवाहामुळं भडगाव येथील पर्यायी पूल पूर्णपणे वाहून गेला आहे.

Kolhapur Rain Update
Kolhapur Rainfall | कोल्हापुरात संततधार; जिल्ह्यात २५४ मि.मी. बरसला

गेल्या दोन दिवसांच्या संततधार पावसामुळं आधीच भडगाव पर्यायी पुलाचा काही भाग खचला होता. त्यामुळं प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून या पुलावरून चंदगडच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद केली होती. ही वाहतूक आझरा गजरगाव मार्गाने वळवण्यात आली होती. आज पूर्ण पूलच वाहून गेला आहे. प्रशासनानं वेळीत खबदारी घेत या पुलावरची वाहतूक बंद केल्यामुळं मोठी दुर्घटना होण्याची शक्यता टळली.

Kolhapur Rain Update
Gadchiroli hevay rain | गडचिरोलीत वीज कोसळून एकाचा मृत्यू, रपटा वाहून गेला, दोन ट्रक फसले!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news