Kolhapur Bus Accident | अंबप फाट्यावर सलग दुसऱ्या दिवशी एसटी बसचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

राजापूर-पुणे बस काँक्रीट बॅरिकेडवर आदळली; अपघातांच्या मालिकेमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
Pune Bengaluru Highway Ambap Phata Accident
Pune Bengaluru Highway Ambap Phata AccidentPudhari
Published on
Updated on

Pune Bengaluru Highway Ambap Phata Accident

पेठवडगाव : पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा परिसरात बुधवारी (दि.२९) पुन्हा एकदा एसटी बसचा अपघात झाला. सलग दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी एसटी बस अपघातग्रस्त झाल्याने या परिसरातील वाहतूक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडे जाणारी राजापूर आगाराची राजापूर–पुणे एसटी बस (क्र. एमएच १३ सीयू ७८३०) अंबप फाटा परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या काँक्रीट बॅरिकेडवर जाऊन धडकली. या अपघातात बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून बसमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

Pune Bengaluru Highway Ambap Phata Accident
Kolhapur News : राजारामपुरी मेन रोडवर वाहनधारकांची कसरत

विशेष म्हणजे, मंगळवारीही याच ठिकाणी ब्रेक निकामी झाल्याने एका प्रवासी बसचा अपघात झाला होता. त्यानंतर काही तासांतच झालेल्या दुसऱ्या अपघातात एका दुचाकीस्वार महिलेला दुखापत झाली होती. या घटनांनंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा एसटी बसचा अपघात झाल्याने अंबप फाटा परिसर अपघातप्रवण ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी या भागातील सुरू असलेली रस्त्याची कामे, अपुरी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजनातील त्रुटी आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप केला आहे. या ठिकाणी तातडीने प्रभावी सुरक्षा उपाययोजना राबवून वाहतूक नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news