Kolhapur Crime | पुलाची शिरोली येथे गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक ; आठ बैलांची सुटका, दोघांवर गुन्हा

पुलाची शिरोली परिसरात पहाटेच्या सुमारास कारवाई
  Crime News
Crime News File Photo
Published on
Updated on

Cattle Rescue Operation Kolhapur

नागाव; बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन पिकअप वाहनांवर कारवाई करण्यात आली. पुलाची शिरोली परिसरात पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून आठ बैलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन चालकांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ३ वाजता दोन पिकअप वाहनांतून गोवंशीय जनावरे कर्नाटकात कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर (क्र. MH-08-W-2023 आणि MH-47-Y-4555) या वाहनांची तपासणी करण्यात आली असता जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. बैलांना घट्ट बांधून, अत्यंत गर्दीत कोंबण्यात आले होते. प्राथमिक चौकशीदरम्यान चालकांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

  Crime News
Kolhapur Crime : कॅन्सरवरील औषधाच्या बहाण्याने भोंदूचा विवाहितेवर बलात्कार

या प्रकरणी राहुल वासू दुर्गे (वय २८, रा. इस्लामपूर, जि. सांगली) आणि कुमार शंकर कोकणे (वय ३३, रा. आप्पाचिवाडी, ता. निपाणी, जि. बेळगाव) यांच्याविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news