कोल्हापूर: बाचणी येथील मुस्लीम समाजाच्यावतीने जालना घटनेचा निषेध

कोल्हापूर: बाचणी येथील मुस्लीम समाजाच्यावतीने जालना घटनेचा निषेध
Published on
Updated on

बिद्री: पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी सनदशीर मार्गाने आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला व गोळीबार करणार्‍या सरकारचा बाचणी मुस्लीम सुन्नत जमातीच्यावतीने निषेध करण्यात आला.

बाचणी (ता. कागल) येथील मशिदीमध्ये मुस्लीम सुन्नत जमातीच्यावतीने बैठक घेण्यात आली. अवेळी महिला, मुले यांच्यावर जो पोलिसांनी लाठी हल्ला केला. तो अत्यंत निंदनीय आहे. मराठा आरक्षण मिळावे. यासाठी पाठिंबा देत असल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी मुस्लीम जमियतचे अध्यक्ष मेहबूब शहाणेदिवाण, माजी सरपंच इकबाल नायकवडी, सचिव मुबारक शहाणेदिवाण, अन्सार नायकवडी, अल्लाबक्ष शहाणेदिवाण, शौकत नायकवडी आदीसह केंबळी, बाचणी, बेलवळे, साके गावचे मुस्लीम समाजबांधव उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news