Kolhapur Maratha Andolan | कोल्हापूर-पुणे एसटी वाहतूक सेवा पूर्ववत | पुढारी

Kolhapur Maratha Andolan | कोल्हापूर-पुणे एसटी वाहतूक सेवा पूर्ववत

पुढारी ऑनलाईन : जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणार्‍या मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. परिणामी ठिकठिकाणी जाळपोळ, आंदोलने, निदर्शने सुरु आहेत. काही ठिकाणची सार्वजनिक प्रवासी सेवा स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, कोल्हापुरातून पुण्याकडे जाणारी एसटी वाहतूक सेवा तात्पुरती थांबवण्यात आली होती जी पुन्हा सुरू झाली आहे. (Kolhapur Maratha Andolan)

जालना जिल्‍ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्‍या अमानुष लाठीमार आणि गोळीबाराच्‍या निषेधार्थ मंगळवारी (दि. ५) कोल्‍हापूर शहर बंद ठेवण्‍यात येणार आहे. सोमवारी दसरा चौकात सकल मराठा समाजातर्फे झालेल्‍या जबाब दो आंदोलनात हा निर्णय घेण्‍यात आला. मंगळवारी (दि. 5) सकाळी दहा वाजता दसरा चौकात आंदोलक जमणार आहेत. Kolhapur Maratha Andolan)

एसटी केएमटी, रिक्षा, व्‍यापारी व्‍यावसायिक आणि सर्व फेरीवाल्‍यांनी बंद ठेवून कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन यावेळी करण्‍यात आले. बंदच्‍या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी दहा वाजता दसरा चौकात एकत्र येण्‍याचा निर्णयही यावेळी घेण्‍यात आला. दसरा चौकातून मोटर सायकल रॅलीव्‍दारे बंदचे आवाहन करण्‍यात येणार आहे. (Kolhapur Maratha Andolan)

Back to top button