

मुदाळतिट्टा: मुरगुड चे माजी नगराध्यक्ष, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक, शेतकरी संघ कोल्हापूरचे माजी अध्यक्ष प्रवीण सिंह विश्वनाथराव पाटील मुरगुडकर यांचा कागल, भुदरगड राधानगरी तालुक्यातील आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मुंबई येथील भाजपा कार्यालयात, मुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नामदार चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत ते मंगळवार दि. 7 आक्टो रोजी प्रवेश करणार आहेत.
याबाबत रविवारी मुरगुड येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात आलेला आहे. गेले वीस वर्षे नामदार मुश्रीफ यांच्याबरोबर स्वतःच्या भावाला सोडून त्यांच्या पाठीशी उभा राहिलो टाईम कोणती करत पण मुश्रीफ यांनी माझी कायम कोंडी केली. गरज सरो वैद्य मरो असा माझा वापर करून घेतला.
काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना आमदार सतेज पाटील यांना अगोदर माजी व मुश्रीफ यांची मैत्री आहे सांगून माझा प्रवेश थांबवला. प्रत्येक वेळी त्यानी राजकीय माझी राजकीय कोंडी केली. त्यामुळे मला राजकीय दृष्ट्या हा निर्णय घेणे भाग पडले.बिद्री साखर कारखाना निवडणुकी संदर्भात मला भीती दाखवण्याची गरज नाही कारण माझे वडील त्या कारखान्याचे संस्थापक संचालक आहेत आणि मी गेले अनेक वर्ष त्या कारखान्यावर संचालक म्हणून काम करत आहे माझा सभासद माझ्या पाठीश ठाम उभा आहे.
स्वागत प्रास्ताविक सुधीर सावर्डेकर यांनी केले यावेळी सुरेश लंबे, अमर कांबळे संपत कोळी संभाजी गायकवाड कृष्णात कापसे शिवाजी पाटील मारुती कांबळे संजय भारमल अरुण पाटील सुधीर मसवेकर यांची भाषणे झाली.
यावेळी एम.बी. ठाणेकर, प्रकाश पाटील विनायक मोरबाळे ,दिग्विजय पाटील, सातारा पाटील, रामचंद्र आगज, वसंतराव शिंदे, एम.बी मेंडके, बाळासो सूर्यवंशी, महादेव तिप्पे, कुंडलिक भांडवले, संजय मोरबाळे उपस्थित होते आभार सत्यजित पाटील यांनी मांनले.