water tank leakage herwad : हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया

एकीकडे इचलकरंजी पाणी योजनेला तीव्र विरोध; दुसरीकडे दूधगंगा नदीच्या पाण्याची उघड नासाडी
water tank leakage herwad : हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया
Published on
Updated on

कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथे दूधगंगा नदीतून उचलण्यात येणारे पाणी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा टाकीतून ओव्हरफ्लो होऊन हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची गरज असताना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मौल्यवान पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. गेल्या पंधरा दिवसापासून हा प्रकार सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

विशेष म्हणजे, एकीकडे दूधगंगा नदीतून इचलकरंजी पाणी योजनेसाठी पाणी देण्यास शिरोळ तालुक्यात तीव्र विरोध सुरू असताना, त्याच तालुक्यात अशा प्रकारे पाण्याची उघड नासाडी होत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

water tank leakage herwad : हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया
Kurundwad Protesters Clash : पंचगंगा प्रदूषणावरून कुरुंदवाड पेटले; पोलिसांशी झटापट, साडेपाच तास चौक बंद!

दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहराला पाणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात सैनिक टाकळी येथे गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. 40 जणांवर गुन्हेही दाखल झाले आहेत टाकळी ते घोसरवाड परिसरातील गावांनी भविष्यात पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, या भीतीने या योजनेला तीव्र विरोध दर्शविला आहे. "स्थानिकांची पाण्याची गरज प्रथम पूर्ण झाली पाहिजे," अशी आंदोलकांची भूमिका आहे.

water tank leakage herwad : हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया
Road construction news | शिरढोण–टाकवडे–कुरुंदवाड मार्गावरील निकृष्ट कामावर नागरिकांचा आक्षेप

मात्र, हेरवाड येथे पाणीपुरवठा टाकी भरल्यानंतरही पाणी सतत ओव्हरफ्लो होत असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. वेळेवर मोटार बंद न करणे अथवा स्वयंचलित नियंत्रण यंत्रणा कार्यरत नसणे, ही या अपव्ययामागील कारणे असल्याची चर्चा आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही होत आहे.

water tank leakage herwad : हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया
Kurundwad Encroachment | कुरुंदवाड शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात; नागरिकांची कारवाईची मागणी

पाणी वाचविण्याचे आवाहन करणाऱ्या यंत्रणांनीच पाण्याची नासाडी रोखण्यात अपयश आल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. एकीकडे पाण्यासाठी आंदोलन, तर दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दूधगंगा नदीचे पाणी वाया जाणे ही मोठी शोकांतिका असल्याची भावना व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित पाणीपुरवठा विभागाने तातडीने गळती व ओव्हरफ्लो थांबवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच भविष्यात पाण्याचा अपव्यय होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

"या प्रकाराबाबत मला कोणतीही माहिती नव्हती.पाहणी करून पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करु."

संजय पुकाळे, ग्रामपंचायत अधिकारी, हेरवाड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news