Kolhapur leopard news | काळजाचा ठोका चुकला, समोर साक्षात मृत्यू उभा होता

आंबा-विशाळगड मार्गावरील वाघझरा येथील घटना
Kolhapur leopard news | काळजाचा ठोका चुकला, समोर साक्षात मृत्यू उभा होता
Published on
Updated on

सुभाष पाटील

​विशाळगड : विशाळगडच्या नागमोडी वळणांवर काल सायंकाळी निसर्गाचा थरार अनुभवायला मिळाला. मानोली येथील अनिकेत बागम, मंदार पाटील आणि अनिल पाटील हे तीन तरुण दुचाकीवरून जात असताना, वाघझरा येथे त्यांची गाठ थेट बिबट्याशी पडली. अवघ्या दहा फुटांवर दबा धरून बसलेल्या या 'डेंजर' सावजाला पाहून तरुणांची पाचावर धारण बसली.

Kolhapur leopard news | काळजाचा ठोका चुकला, समोर साक्षात मृत्यू उभा होता
Ambenali Ghat Rescue | आंबेनळी घाटातील थरारक रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी; 500 फूट दरीत कोसळलेल्या दांपत्याचे मृतदेह अखेर बाहेर

तो थरारक क्षण…​दहा फुटांवर 'साक्षात मृत्यू’

शनिवारची सायंकाळी सहाची वेळ, आजूबाजूला झाडांची दाट गर्दी आणि समोर मृत्यूचे डोळे! चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे दुचाकी थांबली, पण समोरचे दृश्य पाहून तिघांच्याही अंगाचा थरकाप उडाला. रस्त्यापासून अवघ्या दहा फुटांवर, बिबट्या दबा धरून बसला होता. त्याचे ते चमकणारे डोळे थेट या तिघांच्या डोळ्यांत रोखले होते. समोरचे दृश्य पाहून त्यांच्या अंगातून भीतीची लकेर धावली. ​"क्षणभर सुचेनासे झाले की नक्की काय करावे? मागे फिरावे की पुढे जावे? समोर साक्षात मृत्यू उभा होता आणि आमचा थरकाप उडाला होता... फक्त नशीब बलवत्तर म्हणून वाघाने जंगलात धूम ठोकली!" अशी भावना या तरुणांनी व्यक्त केली. बिबट्या नजरेआड होताच घामाने डबडबलेल्या या युवकांनी तिथे एक क्षणही न थांबता आपली दुचाकी विशाळगडच्या दिशेने दामटली.

Kolhapur leopard news | काळजाचा ठोका चुकला, समोर साक्षात मृत्यू उभा होता
Stray Dog Attack Karjat: कर्जतमध्ये भटक्या श्वानांचा बकऱ्यांवर हल्ला; 28 बकऱ्या मृत्युमुखी

भीतीचे सावट

​बिबट्या अदृश्य होताच या तरुणांनी अक्षरशः तिथून पळ काढला. या भागात गव्यांचे दर्शन नेहमीचेच असले, तरी बिबट्याच्या या 'सरप्राईज एन्ट्री'ने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. समोर साक्षात मृत्यू पाहिल्याने या तरुणांनी पर्यटकांना या मार्गावर सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news