Kolhapur crime | शिरोलीत पूर्ववैमनस्यातून सत्तुरने वार करत जीवघेणा हल्ला ; तरुण जखमी

पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्याऐवजी तडजोडीचा सल्ला ... वाढत्या गुन्हेगारीमुळे शिरोली ग्रामस्थांमध्ये संताप
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

नागाव : पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील माळवाडी परिसरात शुक्रवारी रात्री पार्किंगमधून गाडी काढण्याच्या क्षुल्लक वादातून एका चिकन व्यावसायिकाने थेट लोखंडी सत्तुर सारखे हत्यार फेकून मारल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला असून एकजण सत्तुर नाचवत असतानाचे चित्रीकरण सीसीटीव्ही आणि नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले असूनही, पोलिसांनी गुन्हा दाखल न करता आपासात मिटवण्याचा सल्ला दिल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Crime News
Sangli Crime: राजकीय दबाव, पोलिस निष्क्रियतेचा बळी

मिळालेल्या माहितीनुसार शूक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माळवाडी परिसरात गाडी पार्किंगमधून काढत असताना शेजारी लावलेल्या दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकी मालक आणि संबंधित तरुणांमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, दुचाकीवाल्या स्थानिक चिकन व्यावसायिकाने आपल्या हातातील धारदार सत्तुर सारख्या लोखंडी हत्यार पळून जाणाऱ्या तरुणाच्या दिशेने फेकून मारला. तो तरुण प्रसंगावधान राखून बाजूला झाल्याने थोडक्यात बचावला, मात्र हत्यार लागल्याने एक जण जखमी झाला. घटना घडल्यानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Crime News
Hingoli crime news | 23 वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

या गंभीर घटनेनंतर नागरिक आणि पीडित तरुण शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी पुरावे समोर असताना पोलिसांनी दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी दोन्ही गटांना रात्री उशिरापर्यंत ताटकळत ठेवून आपापसात तडजोड करण्याचा सल्ला दिला. या वादात दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याने त्यांच्या करिअरचे कारण पुढे करत पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप होत आहे.

Crime News
Hingoli Crime : दोन गटांत क्षुल्लक कारणावरून हाणामारी

शिरोली गावातील आणि विशेषतः माळवाडी परिसरातील वाढत्या टवाळखोरी व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शिरोलीच्या जागरूक जनतेने नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक, आमदार अमल महाडिक आणि स्थानिक पोलीस ठाण्याला निवेदन दिले होते. या निवेदनाला आठ दिवसही उलटत नाहीत, तोच ही सत्तुर फेकीची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण आहे. तरुणांवर पोलिसांचा कोणताही वचक राहिला नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news