Kolhapur news |...अन् उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला

वडिलांच्या पार्थिवाकडे पाहत राहिली 'वीरा'; गोंडोलीत अश्रूंचा महापूर, पाषाणालाही फुटला पाझर
Kolhapur news |...अन् उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला
Published on
Updated on

सुभाष पाटील

विशाळगड : मृत्यू जेव्हा देशासाठी येतो तेव्हा तो 'गौरव' बनतो, पण जेव्हा तो एका तीन वर्षांच्या चिमुरडीचे पितृछत्र हिरावून नेतो, तेव्हा तो 'क्रूरतेचा कळस' ठरतो. देशाच्या सीमेवर प्राणांची आहुती देऊन शहीद झालेले गोंडोली गावचे सुपुत्र, वीर जवान विक्रम चव्हाण यांचे पार्थिव शुक्रवारी जेव्हा त्यांच्या मातृभूमीत दाखल झाले. तेव्हा केवळ एक गाव नाही, तर संपूर्ण आसमंत रडला.

हवेत उमटणारे 'शहीद विक्रम चव्हाण अमर रहे...' चे नारे एका बाजूला अभिमानाची जाणीव करून देत होते, तर दुसऱ्या बाजूला काळजाचे तुकडे करणाऱ्या आक्रोशाने संपूर्ण वातावरण गोठवून टाकले होते. ​पण या संपूर्ण कारुण्यात, एका दृश्याने तिथे उपस्थित असलेल्या हजारो जनसमुदायाचे काळीज पार पिळून काढले. ते दृश्य होते शहीद विक्रम यांच्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीचे— वीराचे!

Kolhapur news |...अन् उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला
Asgaon Tragic News | सकाळी येतोय म्हणाले, पण ते परत आलेच नाहीत..!

तिचे ते 'निरखून' पाहणे आणि गोठलेला काळ...

​घरच्या अंगणात तिरंग्यात वेढलेलं वडिलांचं पार्थिव ठेवलं होतं. बाजूला तिच्या आईचा हुंदका काळीज चिरत होता, आजोबांचा टाहो दगडालाही पाझर फोडत होता. नातलग, ग्रामस्थ, लष्कराचे जवान... प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते. पण या संपूर्ण आक्रोशात, तीन वर्षांची चिमुरडी वीरा मात्र अत्यंत शांत होती. तिला कदाचित अजून हेही उमजले नव्हते की, ज्या खांद्यावर बसून तिने अख्खं गाव पाहिलं, ते खांदे आता कधीच उठणार नाहीत. ज्या हातांनी तिला मायेने कुरवाळलं, ते हात आता कायमचे शांत झाले आहेत.

​ती तिच्या वडिलांच्या पार्थिवाकडे अत्यंत निरखून, एकटक पाहत होती. तिच्या त्या गोड, निष्पाप डोळ्यांमध्ये ना भीती होती, ना अश्रू... तिथे होता फक्त एक अबोल प्रश्न— "बाबा, तुम्ही असे झोपले का आहात? उठून मला कडेवर का घेत नाही?" तिच्या त्या अबोल नजरेतली आर्तता एवढी तीव्र होती की, क्षणभर तिथे उपस्थित असलेला काळही गोठला असावा.

Kolhapur news |...अन् उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला
Gadhinglaj Shocking News | “आई, मी येतो...” पण भेट होण्याआधीच काळाने घेतले मायलेकाला कवेत

तिचे ते 'निरखून' पाहणे आणि गोठलेला काळ...

​घरच्या अंगणात तिरंग्यात वेढलेलं वडिलांचं पार्थिव ठेवलं होतं. बाजूला तिच्या आईचा हुंदका काळीज चिरत होता, आजोबांचा टाहो दगडालाही पाझर फोडत होता. नातलग, ग्रामस्थ, लष्कराचे जवान... प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते. पण या संपूर्ण आक्रोशात, तीन वर्षांची चिमुरडी वीरा मात्र अत्यंत शांत होती. तिला कदाचित अजून हेही उमजले नव्हते की, ज्या खांद्यावर बसून तिने अख्खं गाव पाहिलं, ते खांदे आता कधीच उठणार नाहीत. ज्या हातांनी तिला मायेने कुरवाळलं, ते हात आता कायमचे शांत झाले आहेत.

​ती तिच्या वडिलांच्या पार्थिवाकडे अत्यंत निरखून, एकटक पाहत होती. तिच्या त्या गोड, निष्पाप डोळ्यांमध्ये ना भीती होती, ना अश्रू... तिथे होता फक्त एक अबोल प्रश्न— "बाबा, तुम्ही असे झोपले का आहात? उठून मला कडेवर का घेत नाही?" तिच्या त्या अबोल नजरेतली आर्तता एवढी तीव्र होती की, क्षणभर तिथे उपस्थित असलेला काळही गोठला असावा.

Kolhapur news |...अन् उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला
Indapur Khadakwasla Canal Water Issue: इंदापूरमध्ये कालव्याच्या पाण्यावरून संताप; खडकवासला पट्ट्यातील शेतकरी आक्रमक

उपस्थितांच्या डोळ्यांचा फुटला बांध; लष्कराचे जवानही हुंदकले

​तिचे ते निष्पाप रूप आणि पितृछत्र हरपल्याची ती क्रूर जाणीव पाहून तिथे उपस्थित असलेल्या जनसमुदायाचा धीर सुटला. अनेक कठीण प्रसंगांना तोंड देणारे लष्कराचे खंबीर जवानही चिमुरड्या वीराकडे पाहून आपले अश्रू रोखू शकले नाहीत. ज्या बापाने देशासाठी प्राणांची आहुती दिली, त्या बापाचे हे शेवटचे रूप पाहणारी वीरा भविष्यात जेव्हा मोठी होईल, तेव्हा तिला आपल्या वडिलांचा सार्थ अभिमान नक्कीच वाटेल; पण आज तिचे ते 'पितृछत्र हरपलेले' रूप पाहून काळाच्या छातीतही धडकी भरली असेल, यात शंका नाही.

​ज्या वयात हाताला धरून चालायचे, त्याच वयात बापाच्या पार्थिवाकडे 'निरखून' पाहण्याची दुर्दैवी वेळ या वीरावर आली. संपूर्ण गोंडोली गावाने, साश्रू नयनांनी आणि जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या वीर सुपुत्राला अंतिम निरोप दिला, पण वीराची ती निष्पाप नजर प्रत्येक डोळ्यात जन्माचे अश्रू ठेवून गेली.

Kolhapur news |...अन् उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला
Chandrapur Lightning Strike | कोरपना तालुक्यात वादळाचा तडाखा; वीज पडून युवक व बैलाचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news