Kolhapur News : कळंबा गॅस पाईपलाईन स्फोटातील जखमी महिलेचा मृत्यू

चिमुरड्यांसह आजोबा गंभीर; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
Kolhapur News : कळंबा गॅस पाईपलाईन स्फोटातील जखमी महिलेचा मृत्यू
(File Photo)
Published on
Updated on

कोल्हापूर : घरगुती गॅस पुरवठा करणार्‍या पाईपलाईनमधील स्फोटात गंभीर जखमी झालेल्या शीतल अमर भोजणे (29, रा. मनोरमा कॉलनी, कळंबा, ता. करवीर) यांचा मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुर्घटनेत जखमी इशिका (3), प्रज्वल (साडेपाच वर्षे), आजोबा अनंत भोजणे (60) यांची प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्यासह फॉरेन्सिक लॅब तंत्रज्ञांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. तपास यंत्रणांची वरिष्ठ पथकेही सकाळपासून कार्यरत होती. गॅस पाईपलाईन जोडणी करणार्‍या कंपनी कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणातून दुर्घटना घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

Kolhapur News : कळंबा गॅस पाईपलाईन स्फोटातील जखमी महिलेचा मृत्यू
Kolhapur violence | सिद्धार्थनगर दंगलप्रकरणी आणखी तिघांना अटक

घटनेला जबाबदार ठरलेल्या दोषीवर मंगळवारी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. चौकशी अहवाल उपलब्ध होताच कार्यवाही होईल, असे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी सांगितले.

घरगुती वापराचा गॅस पुरवठा करणार्‍या पाईपलाईनचा स्फोट होऊन कळंबा येथील मनोरमा कॉलनीतील शीतल भोजणे, मुले इशिका, प्रज्वल व अनंत भोजणे हे भाजून गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाच्या आवाजामुळे मदतीला आलेल्या नागरिकांनी गंभीर जखमी चौघांना खासगी वाहनातून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र सर्वांग होरपळलेल्या महिलेचा उपचार सुरू असताना मध्यरात्री मृत्यू झाला. तर अन्य तिघांची प्रकृती गंभीर आहे.

Kolhapur News : कळंबा गॅस पाईपलाईन स्फोटातील जखमी महिलेचा मृत्यू
kolhapur | शेंडा पार्कात महापालिकेची नवी इमारत; कोल्हापूर शहरात नवीन ‘एरिया’ येणार

जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. स्फोटाच्या तीव्रतेने संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. शेजारी असलेल्या इमारतींचेही नुकसान झाले आहे. कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप कळंब्यासह परिसरातील नागरिक करीत आहेत. संबंधित कर्मचार्‍यांसह ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही संतप्त नागरिकांतून होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news