Kolhapur violence | सिद्धार्थनगर दंगलप्रकरणी आणखी तिघांना अटक

संशयितांना पोलिस कोठडी; सीसीटीव्ही फुटेजद्वारे दंगलखोरांचा शोध
siddharthnagar-brawl-case-three-more-arrested
Kolhapur violence | सिद्धार्थनगर दंगलप्रकरणी आणखी तिघांना अटकPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : सिद्धार्थनगर-राजेबागस्वार परिसरात दोन गटांतील दंगलप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केलेल्या पाचही संशयितांना न्यायालयाने सोमवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आणखी दोघांना सायंकाळी ताब्यात घेण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दंगलखोरांची नावे निष्पन्न करून संबंधितांना अटक करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी तपास अधिकार्‍यांना दिले आहेत.

तौसिफ नियाज शेख (वय 32, रा. राजेबागस्वार, कोल्हापूर), निहाल रहिमतुल्ला शेख (21), सद्दाम यारजंग महात (37), सूरज ऊर्फ अश्पाक शब्बीर नायकवडी (34), इक्बाल दाऊद सरकवास (55, सर्व रा. राजेबागस्वार, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांना रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. रात्री उशिरा असिफ अब्दुल शेख (34) व इकबाल सिकंदर महात (35) यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली.

सिद्धार्थनगर-राजेबागस्वार परिसरात दोन गटांत शुक्रवारी रात्री धुमश्चक्री उडाली होती. जाळपोळ, दगडफेक, वाहनांची तोडफोड याशिवाय पेट्रोलने भरलेल्या बाटल्या जमावाच्या दिशेने भिरकावण्याचा प्रकार घडला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी, पोलिस यांच्यासह नागरिकही दगडफेकीमध्ये जखमी झाले होते. दोन्ही गटांतील संघर्षात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन्ही गटांतील प्रमुखांसह 400 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. संशयिताच्या अटकेसाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. रविवारी रात्री 5 जणांना अटक करण्यात आली, तर सोमवारी दुपारी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्धार्थनगर-राजेबागस्वार परिसरात सोमवारी सकाळपासून शांतता होती. दैनंदिनी व्यवहार पूर्ववत झाले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news