

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालये, अधिविभागातील सर्व शाखांत सर्व कोर्सेस व अभ्यासक्रमाच्या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये प्रवेशासंदर्भात विशेष प्रवेश संधी (कॅरी ऑन) देण्यास विद्यापीठ अधिकार मंडळाने मान्यता दिली आहे.
यासंदर्भातील परिपत्रक उपकुलसचिव डॉ. एम. एस. कबूल यांनी काढले आहे. यापुढे विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये व अधिविभागामध्ये सुरू असणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये संधी देण्यात आली आहे. विशेष प्रवेश संधी निर्णयानुसार देण्यात येणारे प्रवेश हे तात्पुरत्या स्वरूपाचे देण्यात यावेत.
हिवाळी सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यास तसेच एटीकेटी मिळाल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश कायम राहील. ज्या अभ्यासक्रमास पुनर्परीक्षा आयोजित करण्याची तरतूद आहे, अशा अभ्यासक्रमाच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये प्रवेशासाठी विशेष संधी सुविधा देण्यात येऊ नये, असे परिपत्रकात म्हटले आहे.