Kolhapur News : विजय देसाई यांचे नगरसेवकपद रद्द; महापालिका देणार आज पत्र

देसाई यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने महापालिकेत खळबळ
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal Corporation
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय ऊर्फ रिंकू वसंतराव देसाई यांचा कुणबी जातीचा ओबीसी दाखला जात पडताळणी समितीने सोमवारी (दि. २९) अवैध ठरविला. मंगळवारी (दि. ३०) त्याबाबतचे समितीचे पत्र महापालिकेला मिळाले. त्यानुसार देसाई यांचे नगरसेवकपद रद्द झाले असल्याबाबत महापालिका देसाई यांना बुधवारी (दि. १) कळविणार आहे.

देसाई हे प्रभाग क्र. ९ मधील नागरिकांचा मागास प्रवर्गातून कोल्हापूर शहरात सर्वाधिक म्हणजे तब्बल साडेसात हजारच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. सुमारे दोन महिन्यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार नंदकुमार पिसे यांनी देसाई यांच्या जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर जात पडताळणी समितीकडे सुनावणी झाली होती. देसाई यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news