

Kolhapur municipal corporation election 2026 results winners list
कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर महापालिकेवर शुक्रवारी महायुतीचा झेंडा फडकला आहे. अटीतटीच्या झालेल्या लढतीत, काँग्रेसने काँटे की टक्कर देत महापालिकेत सर्वाधिक ३७ जागा पटकावल्या. गतवेळच्या तुलनेत भाजपाने जोरदार मुसंडी मारत २७ जागांवर विजय मिळवला. शिवेसेनेही दमदार कामगिरीच्या जोरावर १५ जाग घेतल्या. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र, जोरदार फटका बसला असून त्यांच्या चारच जागांवर विजय मिळवता आला. सत्तेसाठी ४१ जागांची असणारी मॅजीक फिगर गाठत महायुतीने काँग्रेसचे सत्तेच्या हट्ट्रीकचे स्वप्न धुळीस मिळवले. महापालिका स्थापनेनंतर भाजप प्रथमच सत्तेत आला आहे.
प्रभाग 1 ः काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी , सुभाष बुचडे, पुष्पा नरूटे, रूपाली पोवार, सचिन चौगले
प्रभाग 2 मध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी ,वैभव माने, अर्चना पगार, प्राजक्ता जाधव, स्वरूप कदम विजयी
प्रभाग 3 ः भाजपचे चारही उमेदवार विजयी, प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक , वंदना मोहिते, विजेंद्र माने
प्रभाग 4मध्ये कॉग्रेसचे सर्व उमेदवार विजयी , राजेश लाटकर, स्वाती कांबळे, दिपाली घाडगे, विशाल चव्हाण
प्रभाग ५ मध्ये काँग्रेसचे, विनायक कारंडे, स्वाती यवलुजे, अर्जुन माने विजयी झाले तर भाजपच्या पल्लवी देसाई यांचा विजय झाला.
प्रभाग ६ मध्ये कॉग्रेस तीन तर शिंदे शिवसेना १ जागेवर विजयी, कॉग्रेसच्या तेजस्विनी घोरपडे, तनिष्का सावंत , प्रतापसिंह जाधव आणि शिंदे शिवसेनेच्या शीला सोनुले
प्रभाग ७ मध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी ,यात शिंदे शिवसेनेचे ऋतुराज क्षिरसागर, मंगला साळुंखे तर भाजपचे विशाल शिराळे, दीपा ठाणेकर यांचा समावेश
प्रभाग ८ मध्ये शिंदे सेनेच्या अनुराधा खेडकर, कॉग्रेसच्या अक्षता पाटील, प्रशांत खेडकर, इंद्रजित बोंद्रे
प्रभाग ९ मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी, भाजपचे विजयसिंह देसाई, माधवी पाटील, शिंदे शिवसेनेच्या संगिता सावंत ,शारंगधर देशमुख
प्रभाग १० - महायुती ३ आणि जनसुराज्य १ , भाजपच्या अर्चना कोराणे, पुर्वा राणे, शिंदे शिवसेनेचे अजय इंगवले तर जनसुराज्यचे अक्षय जरग विजयी
प्रभाग ११ मध्ये भाजपच्या निलांबरी साळोखे , माधुरी नकाते तर कॉग्रेसच्या जयश्री चव्हाण आणि शिवसेनेचे सत्यजित जाधव विजयी
प्रभाग १२ मधून कॉग्रेसच्या अनुराधा मुळीक, स्वालिया बागवान तर शिंदे गटाचे अश्किन आजरेकर आणि अजित पवार गटाचे आदिल फरास विजयी
प्रभाग १३ मध्ये भाजपच्या माधुरी व्हटकर ,रेखा उगवे तर काँग्रेसचे प्रविण सोनावणे आणि अजित पवार गटाचे नियाज खान विजयी
प्रभाग १४ मधून कॉग्रेसचे अमर समर्थ , अब्दुल सत्तार मुल्ला, विनय फाळके तर भाजपच्या निलीमा पाटील विजयी
प्रभाग १५ मध्ये काँग्रेसचे संजय मोहिते , रोहित कवाळे, ठाकरे सेनेच्या प्रतिज्ञा उत्तुरे तर भाजपच्या सृष्टी जाधव विजयी
प्रभाग १६ मध्ये काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी दोन जागांवर विजयी, कॉग्रेसचे उमेश पोवार, धनश्री कोरवी तर भाजपचे मुरलीधर जाधव , पूजा पोवार विजयी
प्रभाग १७ मध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी ,यात प्रविण केसरकर, सचिन शेंडे, शुभांगी पाटील, अर्चना बिरांजे
प्रभाग १९ मध्ये कॉग्रेस आणि महायुतीच्या दोन जागा विजयी, सुषमा जरग , दुर्वास कदम काँग्रेस तर भाजपचे विजयसिंह खाडे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाच्या मानसी लोळगे विजयी
प्रभाग २० मधून महायुती विजयी, भाजपचे सुरेखा ओटवकर ,वैभव कुंभार, नेहा तेंडूलकर तर शिंदे शिवसेनेचे अभिजीत खतकर .