Kolhapur news | तावडे हॉटेल परिसरात महापालिकेचा 'हातोडा'; विनापरवाना व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त

जेसीबी, डंपर, गॅस कटर यांसारख्या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने बांधकामे भुईसपाट करण्याचे काम युद्धपातळीवर
Kolhapur news | तावडे हॉटेल परिसरात महापालिकेचा 'हातोडा'; विनापरवाना व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त
Published on
Updated on

कोल्हापूर : शहरातील तावडे हॉटेल परिसरात आज सोमवारी (दि.22) सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या भागातील विनापरवाना व्यावसायिक बांधकामांवर महापालिकेने हातोडा चालवला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कारवाईचे स्वरूप

महापालिकेच्यावतीने आज सकाळपासूनच तीन स्वतंत्र पथके पोलीस बंदोबस्तात तावडे हॉटेल परिसरात दाखल झाली. जेसीबी, डंपर, गॅस कटर आणि आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने विनापरवाना बांधकामे भुईसपाट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Kolhapur news | तावडे हॉटेल परिसरात महापालिकेचा 'हातोडा'; विनापरवाना व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त
Pimpri Chinchwad Encroachment Drive: पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी कारवाई; कुदळवाडीत 10 अनधिकृत प्रार्थनास्थळे पाडली

नेमकी कारवाई कोणावर?

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या परिसरातील एकूण २०४ बांधकामांपैकी १७७ मिळकतींना २५ जूनपर्यंत कायदेशीर स्थगिती मिळाली आहे. मात्र, ज्या २७ मिळकतींना कोणतीही स्थगिती नाही, अशा केवळ व्यावसायिक बांधकामांवर ही कारवाई केली जात आहे. यामध्ये निवासी बांधकामांना वगळण्यात आले आहे.

Kolhapur news | तावडे हॉटेल परिसरात महापालिकेचा 'हातोडा'; विनापरवाना व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त
Chikhli Police Stone Pelting: चिखलीत धार्मिक स्थळांवरील कारवाईदरम्यान तणाव; पोलिसांवर दगडफेक, 8 ते 10 कर्मचारी जखमी

परिसरात तणावपूर्ण शांतता

कारवाई सुरू झाल्यामुळे तावडे हॉटेल परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी स्वतः उपस्थित राहून कारवाईवर देखरेख ठेवत आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news