कोल्हापूर : जीएसटीविरोधात राशिवड्यात आज बाजारपेठ बंद

कोल्हापूर : जीएसटीविरोधात राशिवड्यात आज बाजारपेठ बंद

राशिवडे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाकडून अन्नधान्य व खाद्यान्न वस्तुंवर पाच टक्के जीएसटी लागू केला आहे. जीवनावश्यक वस्तुवर पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी बंद पुकारला आहे. त्या बंदला पाठिंबा देण्यासाठी दि. राशिवडे व्यापारी असोसिएशनच्या वतीने आज (दि.16) बंद पुकारण्यात आला.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका  ग्राहक, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना बसणार आहे. या निर्णयामुळे महागाई वाढणार आहे. या केंद्र शासनाच्या निर्णयाच्या या विरोधात व्यापारी संघटनांनी बंद पुकारला आहे. राशिवडे येथेही व्यापारी असोसिएशनच्या वतीने बंद पुकारण्यात आला असून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

यावेळी अध्यक्ष अमर मगदूम, उपाध्यक्ष अतुल तवटे, सचिव अभय नकाते, कार्याध्यक्ष एकनाथ शिंदे, विश्वनाथ निल्ले यांच्यासह सर्व संचालक, व्यापारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news