Kolhapur Crime | मलकापुरात खळबळ : सख्ख्या भावाकडून डोक्यात फरशी घालून लहान भावाचा खून

संशयित आरोपी फरार झाला असून शाहूवाडी पोलिस शोध घेत आहेत
Malkapur Brother Kills Brother Case
Malkapur Brother Kills Brother CasePudhari
Published on
Updated on

Malkapur Brother Kills Brother Case

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे सख्ख्या भावानेच आपल्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाला असून शाहूवाडी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिकेच्या इमारतीच्या मागील बाजूस सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणी काम करणाऱ्या एका कामगाराचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. मृत व्यक्ती मूळचा छत्तीसगड येथील असल्याचे समजते.

Malkapur Brother Kills Brother Case
Kolhapur Crime : कॅफे, लॉजमध्ये इश्काचा बाजार; युवती, महिला वासनेच्या शिकार

प्राथमिक तपासात, मोठ्या भावानेच लहान भावाच्या डोक्यात फरशीने वार करून त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये रात्री उशिरापर्यंत जोरदार वाद झाला होता. मात्र, या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. सकाळी इतर कामगार कामावर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली असून, घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

या प्रकरणी पोलिस तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news