Malkapur Anuskura Accident | मलकापूर-अणुस्कुरा मार्गावर ट्रकचा अपघात; ८ तासांपासून वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

पांढरेपाणी नजिक ‘सहाव्या मैल’ घाटात घटना
Malkapur Anuskura Road Traffic Jam
Malkapur Anuskura Road Traffic JamPudhari
Published on
Updated on

Malkapur Anuskura Road Traffic Jam

​विशाळगड : मलकापूर-अणुस्कुरा मार्गावरील पांढरेपाणी नजीक ‘सहावा मैल’ घाटातील तीव्र एस-वळणावर रस्त्याच्या मधोमध एका ट्रकचा ॲक्सिलेटर तुटून टायर फुटल्याने वाहतूक कोंडी झाली. शनिवारी (दि.१) पहाटेच्या सुमारास तीव्र उतारावर रस्त्याच्या मधोमधच ट्रक बंद पडल्यामुळे आठ तासांहून अधिक काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

आंबा घाटात रस्ता खचल्यामुळे तेथून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. परिणामी, कोकणातून येणारी वाहतूक पाचल-अणुस्कुरा मार्गे मलकापूरकडे वळवण्यात आली आहे. मात्र, हा ट्रक घाटातील अवघड वळणावरच अडकल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चारचाकी आणि अवजड वाहने जागेवरच खिळली असून, केवळ दुचाकींनाच अत्यंत संथ गतीने मार्ग काढता येत आहे.

Malkapur Anuskura Road Traffic Jam
Kolhapur rain update : जुलैमध्ये जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी!

​रस्त्याच्या मधोमध बंद पडलेला ट्रक हटवण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने हालचाली होत नसल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या वाहतूक कोंडीमुळे विशाळगड व कोकणात जाणारे प्रवासी, स्थानिक ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तासन्‌तास ताटकळत राहावे लागल्याने अवजड वाहनचालकही हैराण झाले असून, हा मार्ग कधी मोकळा आणि सुरक्षित होणार, असा सवाल आता प्रवाशांमधून विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news