कोल्हापूर : मतमोजणीसाठी 686 कर्मचारी; 1200 पोलिस नियुक्त

कोल्हापूर : मतमोजणीसाठी 686 कर्मचारी; 1200 पोलिस नियुक्त
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. यासाठी प्रशासनाने प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे. इतर तात्पुरत्या भौतिक सुविधांची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. मतमोजणीसाठी 686 कर्मचारी, तर 1200 पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत.

कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी शासकीय धान्य गोडावून, रमणमळा, कसबा बावडा येथे आणि हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी शासकीय गोदाम इमारत, राजाराम तलाव येथे होणार आहे. या मतमोजणी केंद्रांची जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी पाहणी केली.

टपाली मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल. ईव्हीएमवरील मतमोजणी सकाळी 8.30 वाजता सुरू होईल. मतमोजणी टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी साहाय्यक, एक शिपाई व एक सूक्ष्म निरीक्षक राहणार आहे. त्यानुसार कोल्हापूर मतदारसंघासाठी 349, तर 48 हातकणंगले मतदारसंघासाठी 337 कर्मचारी असे एकूण 686 कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त केले आहेत.

याव्यतिरिक्त अतिरिक्त 10 टक्के कर्मचारी दोन्ही ठिकाणी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 600-600 असे 1200 पोलिस कर्मचारी सुरक्षेच्या द़ृष्टीने तैनात करण्यात येणार आहेत.

मतमोजणीच्या ठिकाणी सुविधा

मोठा पक्क्या बांधणीचे मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी, निरीक्षक, उमेदवार व निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था, पुरेसा वीज पुरवठा व जनरेटर बॅकअप, दूरध्वनी, इंटरनेट सुविधा असणार आहे. संपूर्ण सुरक्षा व्यवस्था, आग प्रतिबंधक सुविधा यंत्रणा, पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. स्वच्छतागृह, प्राथमिक वैद्यकीय सेवा असणार आहेत.

टेबल संख्या आणि मतमोजणी फेर्‍या

कोल्हापूरसाठी सहाही विधानसभा मतदार संघांत प्रत्येकी 14 मतमोजणी टेबल संख्या असून चंदगड 28, राधानगरी 31, कागल 26, कोल्हापूर दक्षिण 24, करवीर 26 आणि कोल्हापूर उत्तरची 23 फेर्‍यांतून मतमोजणी पूर्ण होणार आहे. हातकणंगलेसाठी सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 14 मतमोजणी टेबल संख्या असून शाहूवाडी व हातकणंगले प्रत्येकी 24, इचलकरंजी 19, शिरोळ व इस्लामपूर प्रत्येकी 21, तर शिरोळसाठी 24 फेर्‍यांतून मतमोजणी पूर्ण होणार आहे. प्रत्येक टेबलसाठी प्रत्येकी एक मतमोजणी प्रतिनिधी राहणार आहे.

टपाली मतदान जमा होण्यास सुरुवात

सैनिक मतदार तसेच अन्य ठिकाणी शासकीय सेवेत असलेल्या जिल्ह्यातील मतदार कर्मचार्‍यांचे टपाली मतदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदार संघांतील हे टपाली मतदान पोस्टातून जिल्हाधिकारी कार्यालयात आणले जात आहे. दररोज सुमारे शंभरहून अधिक मतदारांचे लिफाफे येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल उपजिल्हाधिकार्‍यांच्या दालनात तयार केलेल्या स्ट्राँगरूममध्ये ते बंदोबस्तात ठेवण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news