Kolhapur News | खिद्रापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी इर्शाद मुजावर यांची बिनविरोध निवड

उपसरपंच अमित कदम यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पदाचा राजीनामा
Irshad Mujavar
Irshad MujavarPudhari
Published on
Updated on

Khidrapur Gram Panchayat Deputy Sarpanch Election

कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी इर्शाद बाबासाहेब मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच अमित कदम यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी गुरुवारी (दि.७) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सारिका कदम होत्या. आघाडीच्या पूर्वनियोजित ठरावानुसार अमित कदम यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली.

Irshad Mujavar
kolhapur | बाळूमामांच्या मेंढ्यांच्या विक्रीवर सीसीटीव्हीचा वॉच

ग्रामपंचायत अधिकारी विजय पाटील यांनी प्राप्त अर्ज व कागदपत्रांची छाननी करून ती सरपंचांकडे सादर केली. एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच सारिका कदम यांनी इर्शाद मुजावर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.

विशेष सभेला ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सुनके, अमित कदम, रोहिणी कांबळे, जयश्री लडगे, शहिदा शिरगुप्पे यांच्यासह सर्व सदस्य आणि सुकाणू समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. निवडीची घोषणा होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत तसेच गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news