kolhapur | बाळूमामांच्या मेंढ्यांच्या विक्रीवर सीसीटीव्हीचा वॉच

बकरी व्यवस्थापन समिती स्थापन; संसर्गजन्य मेंढ्या विक्रीवर बंदी
kolhapur | बाळूमामांच्या मेंढ्यांच्या विक्रीवर सीसीटीव्हीचा वॉच
kolhapur | बाळूमामांच्या मेंढ्यांच्या विक्रीवर सीसीटीव्हीचा वॉच
Published on
Updated on

मुदाळतिट्टा : श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील सद्गुरु बाळूमामा यांच्या बकर्‍यांच्या विक्रीवर आता सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. बकरी व्यवस्थापन समितीमार्फत कोल्हापूर सर्किट बेंचने घालून दिलेल्या निर्देशानुसार पशुवैद्यकीय डॉक्टरांचा अहवाल व सल्ल्यानुसारच येथून पुढे बकर्‍यांची विक्री करता येणार आहे. यामुळे अवैध बकरी विक्रीला चाप बसणार आहे.

19 बग्याच्या (कळप) मध्ये 39 हजारांवर बकरी सध्या आहेत. गेले पाच महिने बकरी विक्रीवर निर्बंध असल्याने चार ते पाच हजार बकरी वाढली आहेत. समितीमध्ये पदसिद्ध सदस्या व्यक्तिरिक्त तीन खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांचे पॅनेलही समाविष्ट करावे, असे निर्देश कोल्हापूर सर्किट बेंचने दिले होते. या अनुषंगाने ट्रस्टने बकरी व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. संसर्गजन्य आजार झालेल्या मेंढ्यांची विक्री करू नये. त्याचबरोबर ज्या ठिकाणी मेंढ्यांची विक्री केली जाते त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावून सीसीटीव्हीच्या कक्षेत विक्री करावयाचे आहे. मेंढी व्यवस्थापन समितीमध्ये मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी, सचिव रावसाहेब कोणकेरी, पोलिसपाटील विनायक शिंदे यांच्यासह डॉ. अभिजीत कुलकर्णी, डॉ. निळकंठ लंबे, डॉ. विनोद जाधव यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news