

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह १ ऑक्टोबरपासून सुरू करावे, त्यासाठी २४ सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकिंगही सुरू करावे, अशी सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली. त्यासाठी आवश्यक सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
देखभालीसाठी खासगी एजन्सी
बसवावा. खासबाग परिसर व नाट्यगृह सुरू करण्यासाठी बाहेरील प्रलंबित कामे ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावीत. नाट्यगृहासाठी आवश्यक ट्रान्स्फॉर्मर नाट्यगृहाच्या देखभालीसाठीची एजन्सी याच आठवड्यात निश्चित करा. नाट्यगृहाच्या बुकिंगसाठी सर्वानुमते निश्चित केलेल्या दरानुसार पुढील बुकिंग प्रक्रिया राबविण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. पाटील, संजय भोसले फैलावर घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारामार्फत शहरातील गणेशमूर्ती संकलनासाठी आवश्यक वाहने व हमालांची व्यवस्था झाली नाही. त्यावरून सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील व वर्कशॉप विभागप्रमुख संजय भोसले यांना आयुक्त डॉ. भारूड यांनी चांगलेच फैलावर घेतले. ही बाब गंभीर असून, संबंधित ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त परितोष कंकाळ, नागेंद्र मुतकेकर, सहायक आयुक्त उज्ज्वला शिंदे, संजय सरनाईक, राम काटकर, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, नगरसचिव दिवाकर कारंडे, उपशहर रचनाकार महादेव फुलारी, पद्मल पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह इतर उपस्थित होते.
विधी अधिकारी तायडे यांना निलंबित करा
महापालिकेचे विधी अधिकारी संदीप तायडे यांची चौकशी पूर्ण करून त्यांना कायम निलंबित करण्याचे आदेश आयुक्त डॉ. भारूड यांनी प्रशासनाला दिले. तसेच आढावा बैठकीस वेळेवर उपस्थित न राहिलेले उपआयुक्त किरण धनवाडे यांनाही आयुक्तांनी चांगलेच झापले. धनवाडे यांच्यासह उशिरा आलेल्या पाच अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.