Pudhari Property Expo 2026 | ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ची उत्सुकता वाढली

१६ ऑक्टोबरपासून कोल्हापुरात आयोजन; स्टॉल बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद
Pudhari Property Expo 2026 |
Pudhari Property Expo 2026 |
Published on
Updated on

कोल्हापूर : दसरा-दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी सुवर्णसंधी घेऊन आलेल्या ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान असेंब्ली रोडवरील हॉटेल पॅव्हेलियन येथील मधुसूदन हॉलमध्ये हे तीनदिवसीय भव्य प्रदर्शन भरणार आहे ‘रामसिना ग्रुप’ या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत.

प्रदर्शनातील स्टॉल बुकिंगला बांधकाम व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ज्या बांधकाम व्यावसायिकांना या प्रदर्शनात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आपला स्टॉल लवकरात लवकर निश्चित करावा, असे आवाहन करण्यात येत आहे . सध्या कोल्हापूर आणि लगतच्या उपनगरांमध्ये पायाभूत सुविधांचा वेगवान विकास होत असल्याने घर हा काळ सर्वोत्तम मानला जात आहे. या प्रदर्शनात असंख्य पर्यायांसोबत सणासुदीच्या विशेष सवलती उपलब्ध होणार आहेत. सुरक्षित गुंतवणुकीची खात्री देणारे हे प्रदर्शन खरेदीदारांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

एकाच छताखाली सर्व पर्याय

सर्व बजेटमधील फ्लॅट्स : १, २, ३ आणि ४ बीएचकेचे सर्वसामान्यांना परवडणारे तसेच आधुनिक सुविधांनी युक्त लक्झरी अपार्टमेंट्स.

रो-हाऊस व व्हिला : स्वतंत्र आणि प्रशस्त जीवनशैलीसाठी प्रीमियम बंगलो प्रोजेक्ट्स व व्हिलाचे पर्याय.

गुंतवणुकीसाठी प्लॉट्स : उपनगरांतील वेगाने विकसित होणारे ‘एनए’ प्लॉट्स आणि निसर्गरम्य फार्म हाऊसच्या जागा. तसेच व्यावसायिक दालने : प्राईम लोकेशनवरील दुकाने आणि आधुनिक ऑफिस स्पेसेस.

गृह कर्ज व विशेष सवलतींची सुवर्णसंधी

सर्व प्रकल्पांची तुलना करण्याची संधी एकत्र मिळत असल्याने ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. प्रदर्शनात नामांकित बँका व वित्तीय संस्था सुलभ गृह कर्ज, कमी व्याजदर आणि मंजुरीचे मार्गदर्शन करतील. याशिवाय अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून सणासुदीनिमित्त विशेष फेस्टिव्हल डिस्काऊंट्स आणि स्पॉट बुकिंग ऑफर्स दिल्या जाणार आहेत. कोल्हापुरात स्वतःचे हक्काचे घर किंवा सुरक्षित भविष्यासाठी योग्य गुंतवणूक करू पाहणाऱ्या प्रत्येकाने या तीनदिवसीय एक्स्पोला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

स्टॉल बुकिंग सुरू

आपले प्रकल्प थेट हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बांधकाम व्यावसायिक व उद्योजकांसाठी प्रदर्शनाचे स्टॉल बुकिंग सुरू झाले आहे.

स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : आनंद - ९८५०९९११८६

अतुल : ९८२२४०८४३३.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news