

Chandgad Forest Range
चंदगड : केरवडे (ता. चंदगड) येथे खाजगी मालकी क्षेत्रात बिबट्याचा संचार वाढला असून खबरदारी म्हणून चंदगड वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड व वनपाल कृष्णा डेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.
मागील चार महिन्यापासून या परिसरात बिबट्याचा वावर असून मागील काही दिवसात तीन पाळीव कुत्र्यांचा फडशा पडला आहे. मनुष्य हानी तसेच पाळीव प्राणी हानी होऊ नये, यासाठी वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार खबरदारी घेण्यात येत आहे.
वनरक्षक एम. आय. सनदी, आकाश मानवतकर यांच्यासह वन्यजीव बचाव पथकाचे कर्मचारी अत्याधुनिक ड्रोन यंत्रणेद्वारे त्या बिबट्याच्या संचारावर लक्ष ठेवून आहेत.