Pavankhind Ghat | निसर्गाचे लेणे : केंबुर्णेवाडी-पावनखिंड घाटात पर्यटकांची मांदियाळी

Kolhapur Tourism News | नागमोडी वळणे आणि गेळवडे धरणाचा निळाशार जलाशय पर्यटकांना भुरळ घालत आहे
Kemburnewadi Pavankhind Ghat
Kemburnewadi Pavankhind GhatPudhari
Published on
Updated on

Kemburnewadi Pavankhind Ghat

सुभाष पाटील

​ विशाळगड : ऐतिहासिक पावनखिंड आणि दुर्गराज विशाळगड यांना जोडणारा मार्ग आता केवळ प्रवासाचे साधन न राहता पर्यटनाचे नंदनवन ठरत आहे. केंबुर्णेवाडी ते पावनखिंड दरम्यानच्या घाटात निसर्गाचा अनमोल खजिना उघडला असून, येथील नागमोडी वळणे आणि समोरच दिसणारा गेळवडे जलाशयाचा निळाशार विस्तार पर्यटकांना भुरळ घालत आहे.

​केंबुर्णेवाडी ते पावनखिंड दरम्यानचा हा घाट रस्ता प्रवासासाठी जितका थरारक आहे, तितकाच तो सौंदर्याने नटलेला आहे. घाटाच्या उंचीवरून खाली नजर टाकल्यास डोंगरांच्या हिरव्या शालूतून जाणारा रस्ता एखाद्या रुबाबदार सर्पाप्रमाणे नागमोडी वळणे घेताना दिसतो. या घाटातून दिसणारा गेळवडे धरणाचा विस्तीर्ण जलाशय पर्यटकांच्या मनाचा ठाव घेत आहे. निळाशार पाण्याचा विस्तार आणि सभोवतालची हिरवी वनराई यामुळे हे दृश्य एखाद्या जिवंत पेंटिंगसारखे भासते.

Kemburnewadi Pavankhind Ghat
Kolhapur Panchganga Pollution | ‘आंदोलन अंकुश’ची पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी एल्गारची हाक

विशाळगड परिसरातील हे सौंदर्य सध्या पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. घाटाच्या उंचीवरून खाली पाहिले असता, डोंगररांगांच्या मधून जाणारा वळणावळणाचा रस्ता एखाद्या सर्पाप्रमाणे भासतो. त्यातच गेळवडे धरणाचा विस्तीर्ण जलाशय या दृश्यात अधिकच भर घालतो. हे विहंगम दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत आहे.

​ पर्यटनाची नवी ओळख

पावनखिंडीच्या ऐतिहासिक वारशासोबतच आता येथील निसर्गसौंदर्यही चर्चेचा विषय ठरत आहे. लांबच लांब पसरलेल्या डोंगरदऱ्या आणि जलाशयाचा शांत किनारा यामुळे हा परिसर फोटोग्राफी आणि रील प्रेमींसाठी 'हॉटस्पॉट' बनला आहे. विशेषतः सुट्टीच्या दिवशी या घाटात पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

सुरक्षित प्रवासाचे आवाहन

  • निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठवताना घाटातील नागमोडी वळणांवर सावधपणे वाहन चालवण्याचे आवाहनही स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

  • ​घाटात वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवावा.

  • ​नागमोडी वळणांवर ओव्हरटेकिंग करणे टाळावे.

  • ​सेल्फी काढताना कडेकपारीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर राखावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news