

Kolhapur Rainfall Update Tree Falls in Kolhapur
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह परिसराला आज (दि.२०) दुपारी साडेचारच्या सुमारास वळीव पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे करवीर तहसीलदार कार्यालयासमोरील भले मोठे झाड कोसळले. अर्धा तास शहरासह जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. वाहनधारकांसह नागरिकांचे चांगलेच हाल झाले. मात्र, सकाळपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवेत गारवा निर्माण झाला होता.
मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश भागात सखल भागात पाणी साचले. कोल्हापूर शहरातील कावळा नाका येथील अक्षता मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागली.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात सलग ५ ते ६ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतीतील मशागतीची कामे खोळंबली आहेत.