कोल्हापूर : कागल तालुका तब्बल १९ वर्षानंतर शिष्यवृत्तीमध्ये जिल्ह्यात आघाडीवर

कोल्हापूर : कागल तालुका तब्बल १९ वर्षानंतर शिष्यवृत्तीमध्ये जिल्ह्यात आघाडीवर

म्हाकवे, पुढारी वॄतसेवा : कागल तालुका तब्बल २००४ नंतर इयत्ता पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. तब्बल पाचवी व आठवीचे मिळून १३७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. कागल तालुक्यात पाचवीसाठी एकूण 97 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये ७० ग्रामीण भागातील तर २७ विद्यार्थी शहरी भागातील आहेत. आठवीसाठी २९ विद्यार्थी ग्रामीण भागातील तर अकरा विद्यार्थी शहरी भागातील आहेत असे मिळून एकूण १३७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत.

२००४ नंतर राधानगरी भुदरगड तालुक्याला मागे सारून कागल तालुका प्रथम क्रमांकावर आला आहे. राधानगरी तालुक्यात एकूण पाचवीसाठी ५५ तर आठवीसाठी ७७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत एकूण १३२ विद्यार्थी पात्रधारक बनले आहेत. भुदरगड तालुक्यातील पाचवी व आठवीचे १३२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. गेल्या काही वर्षापासून राधानगरी भुदरगड हे तालुके शिष्यवृत्ती परीक्षेत अग्रेसर होते तब्बल १९ वर्षानंतर कागल तालुका प्रथम क्रमांकावर आला आहे.

विस्ताराने मोठा असणारा करवीर तालुका चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. दोन्ही वर्गाचे मिळून केवळ ९८ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले कागल तालुक्यातील अनेक शाळातील विद्यार्थी राज्य शिष्यवृत्ती यादी चमकले आहेत. कागल राधानगरी भुदरगड तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी राज्याच्या सरासरी गुणवत्ता यादीमध्ये बहुसंख्य संख्येने पात्र झाले आहेत. कागलचे गटशिक्षणाधिकारी जीबी कमळकर यांचे याबाबत मोलाचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news