Chandrayan 3 : चांद्रयान तीनचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू; इस्रो प्रमुखांकडून आनंद व्यक्त | पुढारी

Chandrayan 3 : चांद्रयान तीनचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू; इस्रो प्रमुखांकडून आनंद व्यक्त

पुढारी ऑनलाइन डेस्क : Chandrayan 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज शुक्रवारी (दि.14) चांद्रयान 3 चे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून 2.35 वाजता यशस्वी प्रक्षेपण केले. त्यानंतर काही वेळेतच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी लाँच व्हेईकलपासून अंतराळयान वेगळे झाल्याची घोषणा केली. चांद्रयान 3 चा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू करण्यासाठी त्याला इच्छित कक्षेत ठेवण्यात आले. नंतर चांद्रयान 3 ने त्याच्या अचूक कक्षेत चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. अंतराळ यान सुस्थिती आहे, असे इस्रोने म्हटले आहे.

प्रकल्प संचालक पी. पीरमुथुवेल आणि इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी LVM3 M4 यान यशस्वीरित्या कक्षेत प्रक्षेपित केल्यावर आनंद व्यक्त केला आहे. तसेच संपूर्ण भारताचे अभिनंदन केले. तसेच यावेळी मोहिमेसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व विभागांच्या प्रमुखांनी आपले मनोगत व्यक्त केले. Chandrayan 3

इस्रोचे माजी संचालक के सिवन यांनी ANI ला सांगितले की चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे गगनयान, भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम सारख्या कार्यक्रमांना मनोबल वाढेल.

Back to top button