Kolhapur Accident | देवदर्शनावरून परतताना सांगावच्या महिलेचा अपघाती मृत्यू; चिमुरडा जखमी

रणदेवीवाडीजवळ सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने दुर्घटना
Kagal Sangao Woman Killed
सविता मगदूमPudhari
Published on
Updated on

Kagal Sangao Woman Killed

कसबा सांगाव: मौजे सांगाव (ता.कागल) येथील विवाहिता सविता गणेश मगदूम ( वय ३१ ) यांचा सौंदत्ती देवदर्शनाहून दुचाकीने ने परतताना रणदेवीवाडी जवळ काम चालू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या खड्ड्यात गाडी गेल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर त्यांचा एक वर्षाचा मुलगा सार्थक (वय १) जखमी झाला.

मौजे सांगाव चे मगदूम दाम्पत्य देवदर्शनासाठी दुचाकीवरून सौंदत्ती येथे गेले होते. येताना मंगसुळी , नृसिंहवाडी करून माहेरी अब्दुल लाट येथे भेटून ते गावाकडे जात असताना काळाने त्यांचा घात केला. सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. अपघाताचे गांभीर्य ओळखून रस्त्यावरून जाणाऱ्या चार चाकी गाडीने त्यांना हुपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

Kagal Sangao Woman Killed
Kolhapur Gaur Death | सादळे येथे संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळला गवा; शवविच्छेदनानंतरच उलगडणार मृत्यूचे कारण

डोक्याला गंभीर जखम झाल्याने रुग्णवाहिकेतून त्यांना पुढील उपचारासाठी कागल येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डोक्यात रक्तस्त्राव झाल्याने तेथेही त्यांची गंभीर परिस्थिती पाहता कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, नियतीने अखेर डाव साधला आणि सविता ने अखेरचा श्वास घेतला.

जखमी अवस्थेत आई सोबत असणारा सव्वा वर्षाचा मुलगा सार्थक पोरका झाला. अपघाताची बातमी कळताच अनेकांनी कोल्हापूर येथे रुग्णालयात धाव घेतली. मनमिळावू आणि कष्टाळू असणाऱ्या मगदूम दाम्पत्यावर ओढवलेल्या या प्रसंगाने अनेकांची मन हेलावून गेले. शवविच्छेदानानंतर पहाटेच्या सुमारास मृतदेहावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या तीन लहान मुले, पती व नातलगांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. या अपघाताने संथगतीने सुरू असलेले सिमेंट काँक्रीटच्या बहुचर्चित रस्त्याचे काम अजून किती निरापराधांचा बळी घेणार अशी चर्चा सुरू होती.

Kagal Sangao Woman Killed
Kolhapur News: कोल्हापुरात टोळीयुद्धातून टिंबर मार्केट गंजी माळ परिसरात गुंडांची दहशत, वाहनांची तोडफोड, घरांवर दगडफेक

बाबा दादाला मी सांभाळते...

मृत विवाहिता सविताला तीन मुले असून मोठी मुलगी दूर्वा पाचवीला तर हर्षाली दुसरीला आहे. तर त्यांचा भाऊ सार्थक एक वर्षांचा आहे. आक्रोश करणाऱ्या वडिलांना धीर देत बाबा दादाला मी सांभाळते, असे म्हणणाऱ्या चिमुकल्या दुर्वाचे ते शब्द काळोखात ही अनेकांच्या हृदयाचा ठाव घेत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news