मराठा आरक्षण : इंगळी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांकडून खुर्चीचा त्याग

इंगळी ग्रामपंचायत सरपंचांकडून खुर्चीचा त्याग
इंगळी ग्रामपंचायत सरपंचांकडून खुर्चीचा त्याग

हुपरी; अमजद नदाफ : मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून, जरांगे पाटील हे जोपर्यंत उपोषण सोडत नाहीत, तोपर्यंत इंगळी ता. हातकणंगले येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या खुर्चीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणीही खुर्चीवर बसणार नाही, असा निर्णय घेतला आहे. सरपंच दादासाहेब मोरे, उपसरपंच सुमैय्या नायकवडे यांनी याबाबतची माहिती दिली.

मराठा आरक्षनाची धग आता गावागावात पोहोचली आहे. सर्वसामान्य जनता आणी सर्व जाती, धर्मातील नागरिकांनी या आंदोलनास पाठिंबा दिल्याचे चित्र आहे. इंगळी ता. हातकणंगले येथील सरपंच, उपसरपंच आणी सर्वच सदस्यांनी आपल्या खुर्च्यांवर न बसण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर पासून मराठा समाजाच्यावतीने सुरू होत असलेल्या साखळी उपोषणास इंगळी ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

यावेळी सरपंच दादासाहेब मोरे, उपसरपंच सुमैय्या नायकवडे, सदस्य सुरज बुगटे, शिवाजीराव चौगुले, युवराज चव्हाण, जिनेन्द्र ऐतवडे, अमृत वेताळे, सौ स्वप्नाली भातमारे, सौ.अश्विनी मगदूम, माजी सरपंच रावसाहेब पाटील, अनिल भोसले, उमेश मगदूम, अविनाश मगदूम, जब्बार नायकवडे, संतोष भातमारे, धनाजी पाटील, उमेश शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news