Gokul Election 2026: सत्ताधारी आघाडीकडून 'गोकुळ'च्या अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव निश्चित, 29 ऑक्टोबरला निवड

आमदार सतेज पाटील यांच्या घोषणेकडे लक्ष, गोकुळच्या निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया
Gokul Chairman Shashikant Patil
Gokul Chairman Shashikant PatilPudhari
Published on: 
Updated on: 

Gokul Chairman Shashikant Patil

गुडाळ (आशिष ल. पाटील) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या चेअरमनपदाची निवड गुरुवारी ( दि. २९) होणार आहे. सकाळी ११ वाजता गोकुळ शिरगाव येथील संघाच्या प्रधान कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. आमदार सतेज पाटील यांनी चेअरमनपदासाठी शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या नावाची घोषणा यापूर्वीच केल्याने त्यांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोकुळच्या निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया होईल. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी युसूफ शेख आणि प्रेमचंद राठोड उपस्थित राहणार आहेत.

गोकुळच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू समविचारी शेतकरी आघाडीने महायुतीतील दिग्गज नेत्यांच्या आघाडीचा पराभव केला. एकूण २५ जागांपैकी १३ जागांवर विजय मिळवत या आघाडीने गोकुळची सत्ता काबीज केली. मात्र, काठावरचे बहुमत असल्याने चेअरमनपदाच्या निवडीवेळी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

आमदार सतेज पाटील यांनी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ करतानाच चेअरमनपदासाठी शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या नावाची घोषणा केली होती. गोकुळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचे ते सुपुत्र आहेत. मागील पंचवार्षिक काळात पक्षीय राजकारणामुळे त्यांना चेअरमनपदाची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे यंदा त्यांना ही संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

दरम्यान, गोकुळमध्ये विरोधी महायुती चेअरमनपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार का?, याबाबत उत्सुकता आहे. तसेच महायुतीतील काही संचालक राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हे संचालक निवडणुकीपूर्वी किंवा त्यानंतर सत्ताधारी गटाला पाठिंबा देणार का?, याचे चित्रही गुरुवारी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोकुळच्या चेअरमनपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news