Women's Day 2026 | जीनीने बालपणी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविले; संघर्ष, कठोर मेहनतीने घेतली अवकाशात उंच भरारी

Woman Pilot Jinni Ghunke | कोल्हापूरच्या एका जिद्दी तरुणीने खडतर प्रयत्नांती अवकाशात विमान उडवून 'वैमानिक' होण्याच्या जिद्दीला यशस्वी पूर्णविराम दिला
Kolhapur Female Pilot
जीनी घुणके Pudhari
Published on
Updated on

Kolhapur Female Pilot

चंद्रकांत मुदूगडे

सरूड : जीवन प्रवासात यशस्वी 'भरारी' घेण्याचे वेड जोपासणे आणि त्यासाठी उंच अवकाशात उड्डाण करण्याचे स्वप्न रंगवणे, तेही नकळत्या बालवयात. म्हणजेच फुग्यामध्ये हवा भरण्याचा केलेला हा अट्टाहासच, असा समज स्वाभाविकपणे कोणाचाही होऊ शकतो. मात्र, हा समज खोटा ठरवून कोल्हापूरच्या एका जिद्दी तरुणीने खडतर प्रयत्नांती अवकाशात विमान उडवून 'वैमानिक' होण्याच्या जिद्दीला यशस्वी पूर्णविराम दिला. कोल्हापूरच्या जीनी प्रताप घुणके या जिद्दी तरुणीची 'युथ आयकॉन' ठरणारी ही प्रेरणादायी कहाणी.

कोल्हापूर (शास्त्रीनगर) येथे वैद्यकीय व्यवसायात स्थिरावलेल्या घुणके दम्पत्याचे मूळगांव यळगूड (ता. हातकणंगले). त्यांची मुलगी जीनी हिचे प्राथमिक शिक्षण हॉलिक्रॉस स्कूल मध्ये झाले. येथेच तिने माध्यमिक शिक्षणासाठी पाचवीच्या वर्गामध्ये पाऊल टाकले. त्यावेळी दूरचित्रवाणीवर 'सारा आकाश' नावाची मालिका प्रसिद्ध झाली होती. त्यातील फ्लाईट लेफ्टनंट मोनिका सिंग या व्यक्तीरेखेमुळे जीनीच्या बालमनावर मोठा प्रभाव पडला, नव्हे तर अक्षरशः गारुड तयार झाले.

Kolhapur Female Pilot
Women’s Day: माझ्या दृष्टीने बुडणाऱ्या त्या महिलेचा जीव महत्त्वाचा होता

घरामध्ये उठताबसता तिने 'मला पायलट (वैमानिक)च बनायचंय' अशी एकसारखी रट लावली होती. आई मौसमी या व्यवसायाने डॉक्टर तर वडीलांचाही मेडिकल व्यवसाय. दोघांनीही तीला टीव्ही जगत आणि वास्तव यातला 'जमीन असामान' फरक समजावून सांगितला. अन्य पालकांप्रमाणेच मुलीला डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट यापैकी एक व्यवसायिक पदवीधर बनविण्याचा इरादा असणाऱ्या घुणके दम्पत्याने 'आता केवळ तू शिक्षणावर लक्ष केंद्रित कर' असा जीनीला अनाहुत सल्ला दिला. जीनी मात्र, अवकाशात भरारी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून एक एक दिवस पुढे शैक्षणिक वाटचाल करीत होती.

दरम्यान, जीनी ने दहावीला ९७ टक्के तर बारावीला विज्ञान शाखेतून चांगल्या गुणांनी (८६ टक्के) यश मिळवले. यावेळीही वैमानिक होण्यासाठी आवश्यक म्हणून गणित विषयाची जाणीवपूर्वक निवड केली होती. आता वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी तीने थेट दिल्ली शहर गाठून शिकवणी लावली. येथे वैमानिक होण्यासाठी (डिजीसीए पात्र व प्रवेश परीक्षा) आवश्यक शिक्षण सहा महिन्यात पूर्ण केले. घरी अथवा मैत्री कॅम्पसमध्ये वैद्यकीय वगळता मार्गदर्शक पार्श्वभूमी नसल्याने त्यादृष्टीने जीनीने 'सर्चिंग' अभ्यासावर अधिकाधिक भर देत वेळोवेळी परीक्षा दिल्या.

Kolhapur Female Pilot
Women Day Special Stories: स्वकर्तृत्वाने देशपातळीवर झळकलेल्या मराठी महिला; विविध क्षेत्रांत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल

यामुळे तिच्यातल्या आत्मविश्वासाला अधिक बळकटी मिळाली. यापुढे जाऊन जीनीने वैमानिक क्षेत्रातील व्यवसायिक परवाना प्रशिक्षण घेण्यासाठी न्यूझीलंड देशातील फ्लाईंग स्कुलमध्ये प्रवेश मिळाला. जाण्याची सर्वतोपारी तयारीही केली. नेमकं याचवेळी कोविड-१९ विषाणू संसर्गाचे जगभर थैमान सुरु झाले. जग ठप्प झाल्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याचा धोका ओळखून पालकांनी जीनीला तिच्या ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

तरीही जिद्दी जीनीने न डगमगता एअर हॉस्टेस करिअरचा मार्ग निवडला. जेणेकरून तीला ध्येयाशी चिकटून राहायचं होतं. इच्छा असेल तर मार्ग सापडतोच या उक्तीप्रमाणे कोविड काळात युनायटेड स्टेट 'लॉक डाऊन' नाही हे तिच्या नजरेस आले. मग तीने युएस मधील कॅलिफोर्नियात जाऊन व्यवसायिक परवाना प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. एवढ्यावरच तिला थांबायचं नव्हतं, म्हणून तिने मलेशियाला जाऊन तेथे महत्वाचे ए-३२० रेटिंग मिळविले.

Kolhapur Female Pilot
Women’s Day special: कचऱ्यातून शोधतात ‌‘त्या‌’ भाकरीचा चंद्र

जीनीची ही शैक्षणिक धडपड फलदायी मार्गाकडे सरकण्याची सुचिन्हे दिसू लागली होती. कारण इंडिगो या खाजगी विमान प्रवास कपंनीत काम करण्याची संधी खुणावत होती. यासाठी तीने भारतात तातडीने पाऊलही ठेवले. मात्र मुलाखतीची पूर्वतयारी केली नसल्याने तीला या संधीने हुलकावणी दिली. तरीही या अपयशाने तिला ध्येयाचा पाठलाग दृष्टीपथात आल्याची जाणीव झालीच. परिपूर्ण अभ्यास आणि तयारी झाली असताना पुन्हा एकदा 'इंडिगो'मध्येच खुल्या वर्गातील महिलांसाठी जागा उपलब्ध झाली. यात तिला अपेक्षित यश मिळाले आणि तिची वैमानिक म्हणून निवड झाली. येथे आज ती अधिकारी (दर्जा १) म्हणून कार्यरत आहे. ध्येयाचा जिद्दीने यशस्वी पाठलाग करणाऱ्या जीनीचा तिच्या घुणके परिवाराला प्रचंड अभिमान वाटत आहे.

जीनीला त्यावेळी झाला जग जिंकल्याचा आनंद!

वैमानिक होण्यासाठीचा शैक्षणिक संघर्ष पूर्णत्वाला जाऊ पाहत असताना जीनीच्या पुढची आव्हाने संपलेली नव्हती. दृष्टी (नजर) आणि शारीरिक क्षमता सिद्ध करण्यासाठीची कठीण चाचणी तसेच सलग २०० तास विमान उड्डाण करणे ही तशी सोपी आव्हाने नव्हती. येथेही ध्येयाने पछाडलेल्या जीनीने नमते न घेता कठोर वाटणाऱ्या या दोन्ही चाचण्या यशस्वी पार केल्या. यावेळी आवकाशात विमान चालवताना जीनीला जग जिंकल्याचा आनंद झाला होता. त्याहून घुणके परिवाराचा आनंद गगणात मावत नव्हता.

'जीनीचा जन्मापासून आम्हाला विशेष अभिमान वाटत आला आहे. तिच्यातला तो स्पार्क जाणवत होता. मात्र वैमानिकाचे ध्येय साध्य होईल असे सुरुवातीला तरी अजिबात वाटत नव्हते. म्हणून तीने वेगळी वाट धरावी म्हणून तीचे पाय मागे ओढले नाहीत. उलट आम्ही तीला सतत प्रोत्साहन देत गेलो. समोर येणाऱ्या प्रत्येक संकटावर जिद्द आणि धाडसाने मात करीत तीने शेवटी पायलट होण्याचे स्वप्न कठोर परिश्रमाच्या जोरावर पूर्ण केले.'

- डॉ. मौसमी प्रताप घुणके (वैमानिक जीनीची आई)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news