Kolhapur Crime : रुळावरून चालताना हेडफोनची हाव; तरुणीने गमावला जीव

हातकणंगले येथे अपघात
Kolhapur Crime News
रुळावरून चालताना हेडफोनची हाव; तरुणीने गमावला जीव
Published on
Updated on

हातकणंगले : रेल्वे रुळावरून हेडफोनवर बोलत जात असताना रेल्‍वेने जाेराची धडक दिल्‍याने अनुष्का संतोष पोवार (वय १७, रा. वेताळपेठ, इचलकरंजी) या तरुणीचा मृत्यू झाला. हातकणंगले येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहासमोर बुधवारी सकाळी ११.४५ वा. ही घटना घडली.

अनुष्का व दोन मैत्रिणी रुळावरून चालत जात होत्या. अनुष्का हेडफोन घालून फोनवर बोलत चालली होती. मागून येणार्‍या ‘धनबाद एक्स्प्रेस’चा तिला अंदाज आला नाही. रेल्वे येताच मैत्रिणींनी तिला आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा आवाज अनुष्कापर्यंत पोहोचला नाही. मैत्रिणी दहा फुटांवर असतानाच ‘धनबाद एक्स्प्रेस’ची धडक अनुष्काला बसली. त्यात अनुष्काच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. अनुष्काला उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news