Kolhapur Cylinder Fire : सरवडेत गॅस गळतीमुळे सिलेंडरचा भडका; घराचे मोठे नुकसान, घरमालक जखमी

सुदैवाने मोठा अनर्थ टळला, परिसरात भीतीचे वातावरण
Kolhapur Cylinder Fire
सरवडे येथे संजय साठे यांच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या आगीने सिलेंडरची झालेली अवस्था.
Published on: 
Updated on: 

सरवडे : येथील संजय दिनकर साठे यांच्या राहत्या घरी गॅस सिलेंडरमधून गॅस गळती होऊन अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने घराचा काही भाग जळून मोठे नुकसान झाले. आग विझविण्याच्या प्रयत्नात संजय साठे यांच्या डोक्याला भाजल्याने ते जखमी झाले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

साठे यांच्या घरगुती गॅस गळतीमुळे सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने घरात एकच धावपळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संजय साठे यांनी गॅस सिलेंडर बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आगीच्या झळांमुळे त्यांच्या डोक्याला भाजले. परिस्थिती गंभीर बनत असताना बिद्री कारखान्याच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. गावातील नागरिक व अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनी गॅस सिलेंडरची आग आटोक्यात आणली.

या आगीत घरातील साहित्याचे व काही भागाचे नुकसान झाले आहे. भरवस्तीत गॅस सिलेंडरला आग लागल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते, मात्र मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.